Video Making Competition : खुशखबर! राज्यातील शिक्षकांना व्हिडीओ निर्मिती स्पर्धेद्वारे 50 हजार रुपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी!

Video Making Competition 2023 : राज्यातील शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी, राज्यातील शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन, ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी खुल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे (Video Making Competition) आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन

Video Making Competition

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 साठी नियोजन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीमध्ये प्रस्तुत स्पर्धेसाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक-प्रशिक्षक यांचे कडून आवेदन स्वीकारण्याचे प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे. 

राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 बाबत आयोजन, सविस्तर सूचना वितरण व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना सोपविण्यात आलेले आहेत.

यानुसार सदर स्पर्धेसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करिता परिषदेमार्फत https://scertmaha.ac.in/vcomp2023/ ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदरील लिंकवर स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक-प्रशिक्षक यांनी नोंदणी करावयाची आहे. [नाव नोंदणी येथे करा]

विधानसभा प्रश्नोत्तरे - शिक्षकांना दिलासा - मोफत गणवेश बाबत मोठा निर्णय - कंत्राटी कर्मचारी निर्णय पहा

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेसाठी गट

स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे 06 गट करण्यात आलेले आहेत

  1. गट क्र. १ - १ ली व २ री
  2. गट क्र. २ - ३ री व ५वी
  3. गट क्र. ३ - ६ वी ते ८ वी
  4. गट क्र. ४ -  ९ वी ते १० वी
  5. गट क्र ५- ११ वी व १२ वी
  6. गट क्र. ६- अध्यापक विद्यालय

स्पर्धेसाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने पोर्टलवर शाळेची माहिती, शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय. डी. बँक खाते तपशील, व्हिडीओ लिंक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

स्पर्धेसाठी संबंधितांनी गटनिहाय भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह या विषयांपैकी आपला योग्य तो विषय निवडावा. 

विजेत्याला मिळणार 50 हजाराचे रोख बक्षीस

व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमधील विजेत्याला तालुका स्तरावर 84 पुरस्कार व प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर 84 पुरस्कार व प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तर राज्य स्तरावर देखील 84 पुरस्कार व प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकांसाठी 40 हजार तर तृतीय क्रमांकांसाठी 30 हजार रुपयाचे रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. [संपूर्ण तपशील येथे पहा]

$ads={2}

Previous Post Next Post