विधानसभा प्रश्नोत्तरे - मोफत गणवेश योजना संदर्भात महत्वाचा निर्णय घेणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Free Uniform Scheme

Free Uniform Scheme : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा (Uniform) लाभ शाळा व्यवस्थापन समिती (SMC) द्वारे देण्यात येत आहे. मात्र शालेय गणवेश उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर महिला बचत गटांना देण्याचा सकारात्मक विचार करण्यात घेणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विधानसभेत सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचे काम स्थानिक पातळीवर करण्याबाबतचा प्रश्न सदस्य सर्वश्री अनिल देशमुख, आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, महिला बचतगटांना गणवेश तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचे काम स्थानिक पातळीवर देण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले. [मोफत गणवेश शासन निर्णय पहा]


शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post