Provident Fund Status Online : सामान्य भविष्य निर्वाह निधीचा तपशील ऑनलाईन पाहता येणार, तुमचे वार्षिक लेखा विवरण तपशील येथे चेक करा..

Provident Fund Status Online : राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट अशी आहे की, सन 2022 23 मधील भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) चे वार्षिक लेखा विवरण कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, भविष्य निर्वाह निधीचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे.

वार्षिक लेखा विवरण तपशील येथे चेक करा

Provident Fund Status Online

भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) चे सन 2022 23 चे वार्षिक लेखा विवरण (Annual Account Statement) सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून, त्याची प्रत्यक्ष प्रत (Hard Copy) देणे थांबविल्याचे महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महालेखापाल कार्यालय यांनी लेखा आणि कोषागार संचालकांना 2022-23 या वर्षासाठी GPF Account Slips प्रदान केल्या असून, त्या Sevaarth या वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत. कर्मचारी हे विवरण डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात.

पावसाळी अधिवेशन तारांकित प्रश्न - या शिक्षकांना दिलासा पहा

माहिती दुरुस्तीसठी या मेलवर कळवा

खात्याच्या स्लिपमध्ये विसंगती आढळून आल्यास संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यामार्फत वरिष्ठ उपमहालेखापाल (निधी), महालेखापाल यांच्या निदर्शनास आणल्या जाऊ शकतात. गहाळ क्रेडिट/डेबिट, जन्मतारीख आणि नियुक्तीची तारीख इ. माहिती स्लिपवर छापली नसल्यास, नोंदी पडताळणी आणि अद्ययावत करण्यासाठी agaeMaharshtra1@cag.gov.in या ईमेलवर कळवावे, असेही महालेखाकार कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात २७% वाढ पहा
कंत्राटी कर्मचारी संदर्भात धोरणात्मक निर्णय? पहा

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post