Government Employees DA News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता या महिन्यात मिळणार, सहा महिन्याची थकबाकी किती मिळणार? पहा...

Government Employees DA News : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात सरकारने नुकतीच वाढ केली आहे, ही वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 पासून मिळणार असून, जुलै 2023 च्या वेतनासोबत थकबाकी रक्कम रोखीने मिळणार आहे, मात्र पगारात किती वाढ होईल? एकूण सहा महिन्याची थकबाकी रक्कम किती मिळणार? सविस्तर वाचा..

$ads={1}

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

Government Employees DA News

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आता राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना 42% प्रमाणे महागाई भत्ता मिळत आहे. तो यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 38% प्रमाणे मिळत होता, दिनांक 30 जून 2023 रोजी राज्याच्या वित्त विभागाने महागाई भत्त्यात 4% वाढीचा शासन आदेश निर्गमित केला असून, ही DA वाढ दिनांक 1 जानेवारी 2023 पासून लागू असणार आहे.

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 9% ते 16% वाढ

राज्यातील 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू असणारे कर्मचारी आणि असुधारीत वेतनश्रेणी लागू असणारे 5 व्या व 6 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या पुढील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.

राज्यातील पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 16% वाढ करण्यात आली आहे. तसेच सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 9% टक्यांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. तर यांना देखील दिनांक 1 जानेवारी 2023 पासून ही वाढ देण्यात येणार आहे. सविस्तर वाचा..

$ads={1}

राज्यातील या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा निर्णय लागू

राज्यातील असे कर्मचारी ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी / कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना देखील महागाई भत्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही हा निर्णय लागू करण्याचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे. [येथे पहा GR]

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता या महिन्यात मिळणार

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही दिनांक 1 जानेवारी 2023 पासूनच्या थकबाकीसह माहे जुलै 2023 च्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनासोबत रोखीने देण्याबाबत कळविण्यात आले आहे. शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तिवेतनावरील महागाई वाढ देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश, योग्य त्या फेरफारांसह, आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहणार असल्याचे आदेशात म्हंटले आहे. 

हे ही वाचा जुनी पेन्शन योजना लेटेस्ट बातमी - कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज पहा - सरकारी कर्मचारी आरोग्य योजना संदर्भात मोठा निर्णय पहा

महागाई भत्ता सहा महिन्याची थकबाकी किती मिळणार?

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढ ही दिनांक 1 जानेवारी 2023 पासून देण्यात येणार असून, एकूण सहा महिन्याची थकबाकी रक्कम ही रोखीने जुलै महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार आता पगारात कितीने वाढ होणार? किंवा एकूण DA ची सहा महिन्याची थकबाकी किती मिळणार? हे तुम्ही खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर पाहू शकता. 

प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वेगवेगळे असू शकेल, त्याप्रमाणे तुम्ही पुढील सूत्राच्या आधारे (Calculate Salary From Basic Pay) महागाई भत्ता वाढ किती मिळणार हे काढू शकता.

  • उदा. समजा तुमचे जानेवारी 2023 चे मूळ वेतन हे 26800 आहे.
$ads={1}
  • आता या मूळ वेतनाला 4 गुणून 100 ने भागावे. (26800 * 4 / 100 = 1072)
  • म्हणजेच तुमच्या मूळ वेतनानुसार वाढीव DA च्या दराप्रमाणे जानेवारी महिन्याची वाढ ही 1072 रुपये असणार आहे.
  • आणि असे जानेवारी ते जून एकूण 6 महिन्याची थकबाकी साठी 1072 ला 6 ने गुणावे. (1072 * 6 = 6432)
  • म्हणजेच वाढीव दराप्रमाणे एकूण थकबाकी सहा 6 हजार 432 रुपये महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.

महागाई भत्ता थकबाकी रक्कम ऑनलाईन येथे चेक करा..

Previous Post Next Post