Central Government Health Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! CGHS योजनेबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर..

Central Government Health Scheme : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणारी Central Government Health Scheme (CGHS) आरोग्य योजनेच्या नियमात बदल केले असून, आता यापुढे महिला आणि पुरुष केंद्रीय  कर्मचाऱ्यांना या आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. CGHS योजना काय आहे? आणि सरकारने कोणते बदल केले आहेत? त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे, याविषयी सविस्तर वाचा..

$ads={1}

केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) काय आहे?

Central Government Health Scheme

CGHS म्हणजे Central Government Health Scheme ही केंद्र सरकारची आरोग्य योजना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. CGHS अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी तसेच औषधे आणि आरोग्य विषयीच्या तपासणी करण्यासाठी CGHS या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध आहे. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील (आई-वडील, सासू-सासरे) यांना देखील ही सुविधा लागू आहे. ही आरोग्य योजना आतापर्यंत फक्त महिला कर्मचाऱ्यांना लागू होती. मात्र आता यापुढे पुरुष आणि महिला दोघानाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण (Ministry of Health & Family Welfare) मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार आता केंद्र सरकारची आरोग्य योजनेतील लाभ (CGHS Benefits) यापुढे पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात आले आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त केंद्र सरकारी महिला कर्मचाऱ्यांना लागू होती. मात्र यापुढे महिला व पुरुष दोघानाही या सरकारी कर्मचारी आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

विशेष म्हणजे या आरोग्य योजनेंतर्गत महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे आई-वडील किंवा सासू-सासरे यांना देखील CGHS चा लाभ घेता येणार आहे. याचा फायदा देशातील जवळपास 42 लाख सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

हे ही वाचा जुनी पेन्शन योजना लेटेस्ट बातमी - कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज पहा - कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ 

Central Government Health Scheme

राज्यातील कर्मचाऱ्यांना आता वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस (Cashless) सुविधा मिळणार

राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना  (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आणि केंद्राची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana) यांचे एकत्रिकरण करून राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण 5 लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आता वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस (Cashless) सुविधा मिळणार आहे, Cashless Mediclaim सुविधेअंतर्गत रुपये 5 लाखापर्यंत लाभ घेता येणार आहे. सविस्तर वाचा..

मोठा निर्णय ! सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधा 

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post