7th Pay Commission Salary Arrears : 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 4 था हप्ता मंजूर, जूनच्या च्या पगारात मिळणार थकबाकीची रक्कम शासन निर्णय जारी..

7th Pay Commission Salary Arrears : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्य शासनाने 7 व्या वेतन आयोगानुसार 4 थ्या हप्त्याची वेतन थकबाकी रक्कम देण्याबाबत निर्णय घेतला आहे, तसा अधिकृत शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला असून, आता राज्य शासकीय व इतर प्राप्त पात्र कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची 4 थ्या हप्त्याची (7th Pay Commission Salary Arrears) रक्कम जूनच्या पगारासोबत मिळणार आहे, सविस्तर बातमी पाहूया..

7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 4 था हप्ता मंजूर

7th Pay Commission Salary Arrears

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2023 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या 4 थ्या हप्त्यांची रक्कम भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याबाबत अथवा रोखीने देण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहे. 7th Pay Commission Salary Arrears

  • निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या 4 थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, 2023 च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे.
  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 4 थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे.
  • सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 4 थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२३ च्या च्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे.

जूनच्या च्या पगारात मिळणार थकबाकीची रक्कम शासन निर्णय जारी

भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (National Pension Scheme) अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना (DCPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात बाबत वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 7th Pay Commission Salary Arrears

जे कर्मचारी (भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह) दिनांक 1 जून 2022 ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या उर्वरीत हप्त्यांची रक्कम रोखीने अदा करण्यात बाबत कळविण्यात आले आहे. [शासन निर्णय]

केंद्राप्रमाणे 'आता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष येथे पहा
महागाई भत्ता 38 टक्क्यावरून 42 टक्के येथे पहा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post