RTE Admission 2023 24 : 'आरटीई' 25 टक्के प्रवेश 2023 24 अंतर्गत प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीत 8 हजार 826 मुलांची निवड करण्यात आली आहे, तसा मेसेज पालकांना पाठवण्यात आला असून, आता 'आरटीई' प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी सुरु झाली आहे.
'आरटीई' 25 टक्के प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत 8826 मुलांना संधी
RTE Admission 2023 24 : 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत 8 हजार 826 बालकांना प्रवेशाची संधी मिळाली असून, आता प्रवेश निश्चित करण्यासाठी अर्जात नमूद केलेले कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. यामध्ये राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मुलांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
'या' तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार
'आरटीई' 25 टक्के प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक 28 जून 2023 पासून सुरुवात झाली असून, प्रवेश निश्चित करण्यासाठी शेवटची तारीख ही दिनांक 7 जुलै 2023 पर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे घेऊन पडताळणी समितीकडून पडताळणी करून प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 (RTE Admission 2023)
- एकूण प्राप्त अर्ज (Number of Application) - 364413
- लॉटरी पद्धतीने निवड (Number of Selections) - 94700
- प्रतीक्षा यादीत निवड (Waiting List) - 81129
- पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित (Admitted in 1st round) - 64110
- दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित (Admitted in 2nd round) - 13713
- तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा (RTE 3rd round Vacancy) - 8826
- तिसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित (Admitted in 3rd round) - 50 [Live अपडेट पहा]
'आरटीई' प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी सुरु
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसारस RTE 25% ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 अंतर्गत अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीत मुलांची निवड करण्यात आली असून, आवश्यक ते सर्व मूळ कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करून देण्यात आले आहे.[मॅसेज (SMS) आला नसेल तर येथे पहा]
निवड झालेल्या पालकांनी अर्जात नमूद केलेल्या कागदपत्रांच्या माहितीनुसार सदर कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी सुरु झाली असून दिनांक 7 जुलै 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.[अर्जाची स्थिती तुम्ही येथे पाहू शकता.]