RTE Admission 3rd List : अखेर ! 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची तिसरी फेरी सुरु, तिसऱ्या यादीत निवड झालेल्या पालकांना मॅसेज (SMS)..

RTE Admission 3rd List : 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची तिसरी फेरी अखेर सुरु झाली असून, प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीतील मुलांना 'आरटीई' प्रवेशाची संधी मिळणार आहे, प्रतीक्षा यादीतील पहिल्या यादीत 25 हजार 898 मुलांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी 13 हजार 709 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहे, आता 'आरटीई' ची तिसरी फेरी म्हणजेच प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या यादीतील मुलांना आता अनुक्रमे रिक्त जागानिहाय अनुक्रमे मोबाईल क्रमांकावर मॅसेज (SMS) पाठवण्यात आले आहे.

'आरटीई' 25 टक्के अंतर्गत 77 हजार 823 मुलांचे प्रवेश निश्चित

RTE Admission 3rd List

शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार 'आरटीई' 25 टक्के अंतर्गत राज्यातील नामांकित खाजगी शाळेत मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आता प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या मुलांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे.

आतापर्यंत RTE Admission च्या पहिल्या फेरीत 64 हजार 110 , दुसऱ्या फेरीत 13 हजार 713 असे एकूण 77 हजार 823 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. [मॅसेज (SMS) आला नसेल तर येथे पहा]

अखेर ! 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची तिसरी फेरी सुरु

'आरटीई' ची तिसरी फेरी कधीपासून सुरु होणार, याबाबत पालकांकडून सातत्याने विचारणा होत होती. अखेर प्रतीक्षा संपली असून, प्रतीक्षा यादीतील पुढील मुलांना 'आरटीई' 25 टक्के प्रवेश फॉर्म भरताना जो मोबाईल क्रमांक दिला होता त्यावर निवड झालेल्या मुलांना मॅसेज (SMS) पाठवण्यात आले आहे. याबाबतचे स्टेट्स अर्जाची स्थिती तुम्ही येथे पाहू शकता.

'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 (RTE Admission 2023)

  1. एकूण प्राप्त अर्ज (Number of Application) - 364413
  2. लॉटरी पद्धतीने निवड  (Number of Selections) - 94700
  3. प्रतीक्षा यादीत निवड  (Waiting List) - 81129
  4. पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित (Admitted in 1st round) - 64110
  5. दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित (Admitted in 2nd round) - 13713
  6. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा (RTE 3rd round Vacancy) - 12185{alertInfo}

'आरटीईच्या' तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या मुलांचे प्रवेशपत्र उपलब्ध

'आरटीईच्या' तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या पालकांना मोबाईल क्रमांकावर मॅसेज (SMS) पाठवण्यात आले असून, त्यांना प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

मॅसेज (SMS) आला नसेल तर येथे पहा

पालकांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे आणि पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून नंतर शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा. त्यासोबत अर्जात नमूद केलेले कागदपत्रे सादर करावीत उदा Address, Birth Certificate, Income Certificate इतर आवश्यक कागदपत्रे. ['आरटीई' प्रवेशपत्र लगेच डाउनलोड करा]

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post