RTE Admission 2023 24 : 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 अंतर्गत राज्यातील नामांकित खाजगी शाळेत आतापर्यंत राज्यातील 77 हजार 823 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, आरटीईच्या तिसऱ्या फेरीत अजूनही राज्यात 12 हजार 185 मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे, RTE च्या रिक्त असलेल्या जिल्हानिहाय जागा सविस्तर पाहूया..
'आरटीई' अंतर्गत 77 हजार 823 मुलांचे प्रवेश निश्चित
शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार 'आरटीई' 25 टक्के अंतर्गत राज्यातील नामांकित खाजगी शाळेत मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आता प्रतीक्षा यादीतील मुलांना रिक्त असलेल्या जागांवर संधी देण्यात येत आहे. आतापर्यंत RTE Admission च्या पहिल्या फेरीत 64 हजार 110 , दुसऱ्या फेरीत 13 हजार 713 असे एकूण 77 हजार 823 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अजून 12 हजार 185 जागा रिक्त आहेत.
'आरटीईच्या' तिसऱ्या फेरीत 12185 मुलांना प्रवेशाची संधी मिळणार
'आरटीई' ची तिसरी फेरीचे काम सुरु असून, दिनांक 25 जून 2023 नंतर मुलांना अनुक्रमे मेसेज पाठवण्यात येणार आहे. या फेरीत राज्यातील 12 हजार 185 जागांसाठी मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. यामध्ये ज्या मुलांची निवड ही प्रतीक्षा यादीत झालेली आहे, प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीतील पुढच्या मुलांना आता संधी मिळणार आहे. याबाबतचे स्टेट्स अर्जाची स्थिती तुम्ही येथे पाहू शकता.
'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 (RTE Admission 2023)
- एकूण प्राप्त अर्ज (Number of Application) - 364413
- लॉटरी पद्धतीने निवड (Number of Selections) - 94700
- प्रतीक्षा यादीत निवड (Waiting List) - 81129
- पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित (Admitted in 1st round) - 64110
- दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित (Admitted in 2nd round) - 13713
- तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा (RTE 3rd round Vacancy) - 12185{alertInfo}
'आरटीईच्या' तिसऱ्या फेरीतील जिल्हानिहाय आकडेवारी
'आरटीई' प्रवेशाची तिसरी फेरीतील मुलांच्या पालकांना सोमवार नंतर अनुक्रमे मेसेज पाठवण्यात येणार आहे. सद्यस्थित रिक्त असलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील अनुक्रमे मुलांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.
नोट- RTE प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीतील रिक्त जागांची आकडेवारी ही प्रतीक्षा यादीत निवड केलेल्या मुलांचे प्रवेश निश्चित न झाल्याने राहिलेल्या जागांनुसार अपडेट आकडेवारी आहे. त्यामुळे थोडाफार बदल होण्याची शक्यता असू शकते.
आरटीईच्या तिसऱ्या फेरीतील ऍडमिट कार्ड येथे डाउनलोड करा
प्रतीक्षा यादीतील मुलांना अनुक्रमे मेसेज सोमवार नंतर पाठवण्यात येणार आहे, या तिसऱ्या फेरीत ज्या पालकांना मेसेज मिळेल किंवा (अर्जाची स्थिती) चेक करून जर निवड झालेली असेल त्यांनी लगेच Admit Card ची प्रिंट आणि हमी पत्राची प्रिंट काढून घ्यावी. [शाळानिहाय रिक्त जागा येथे पहा]
Admit Card काढण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर 'अर्जाची स्थिती' (Application Status) या टॅब वर आपला अर्ज क्रमांक टाकावा आणि ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील काढून घ्यावी. [सविस्तर येथे पहा]
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
'आरटीईच्या' तिसऱ्या फेरीतील शाळानिहाय रिक्त जागा येथे पहा
पाचवी आठवीच्या मुलांना परीक्षा पास होणे बंधनकारक
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.