RTE School List Vacancy Status : 'आरटीई' 25% प्रवेश 2023 लॉटरी अंतर्गत प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या 25892 मुलांना प्रवेशाची संधी देण्यात आली असून, त्यासाठीची अंतिम मुदत (दि 19) रोजी संपणार आहे. आता उर्वरित रिक्त असलेल्या जागांसाठी प्रवेशाची तिसरी फेरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या मुलाचा तिसऱ्या फेरीत RTE प्रवेशासाठी नंबर लागेल का? यासंदर्भात अधिकृत घोषणा होईपर्यंत तुम्ही शाळानिहाय असणाऱ्या रिक्त जागेनुसार अंदाज लावू शकता, त्यासाठी ही माहिती काळजीपूर्वक समजून घ्या आणि शाळेनिहाय किती जागा अजून शिल्लक आहे ते पहा..
'आरटीई' प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत या मुलांना मिळणार संधी
'आरटीई' प्रवेशाच्या पहिल्या फेरीत लॉटरी मध्ये निवड झालेल्या मुळ निवड यादीतील मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली होती. त्यामध्ये राज्यातील 64 हजार 206 मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.
त्यांनतर रिक्त असलेल्या जागांसाठी दुसऱ्या फेरीत प्रतीक्षा यादीतील 25 हजार 892 मुलांना अनुक्रमे मेसेज पाठवण्यात आले असून, त्यांच्या प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणी सुरू आहे. दिनांक 19 जून 2023 ही अंतिम मुदत असून त्यांनतर रिक्त असणाऱ्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील उर्वरित मुलांना (क्रमाने रिक्त जागांच्या संख्येनुसार) 'आरटीई' प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
RTE प्रवेशाची तिसरी फेरी होणार का? याबाबत पालकांकडून वारंवार विचारणा होत आहे. जर प्रतीक्षा यादीतील 25892 मुलांपैकी काही जागा शिल्लक राहिल्याच तर मग तिसऱ्या फेरीत वेटींग लिस्ट च्या इतर मुलांना (अनुक्रमे) प्रवेशाची संधी जाण्याची शक्यता आहे.
शाळानिहाय रिक्त जागा येथे चेक करा
मात्र अद्याप पर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीदेखील तुम्ही RTE च्या पोर्टल वर जाऊन तुमच्या मुलाचा ज्या शाळेत नंबर लागलेला आहे. त्या शाळेत किती जागा अजून रिक्त आहे? त्यानुसार तुम्हाला अंदाज बांधता येऊ शकतो.
उदा. समजा तुमच्या मुलाचा नंबर XYZ शाळेत 10 नंबर ला वेटींगवर (प्रतीक्षा यादीत) आहे. आणि त्यामध्ये आरटीई च्या दुसऱ्या फेरीत 6 मुलांना प्रवेश घेण्याची संधी मिळालेली आहे.
आता या 6 पैकी जर 4 मुलांचे प्रवेश निश्चित झाले, तर अजून 2 जागा शिल्लक आहे, म्हणजे आता पुढील 2 मुलांना संधी मिळू शकते. तर हे कसे चेक करायचे त्यासाठी पुढील स्टेप Follow करा.
- सर्वप्रथम आरटीईच्या अधिकृत या पोर्टलवर जा (https://student.maharashtra.gov.in/)
- तिथे List of Schools (Along with approved Fee) असा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा
- त्यानंतर Search School असा टॅब ओपन होईल त्यामध्ये आवश्यक ते फिल्टर लावा State - Maharashtra
- District - तुमचा जिल्हा निवडा
- Search - By Block / By Name (By Block ला सिलेक्ट करा)
- Block/Taluka -(तुमचा तालुका/मनपा क्षेत्र निवडा)
- RTE Quota - All / RTE (RTE हा पर्याय निवडा)
- Academic Year - 2023-2024
- List of Schools Under Selected Block (आता तुमच्या तालुका/ मनपा क्षेत्रातील शाळांची लिस्ट दिसेल त्यामधून तुम्हाला मिळालेली शाळा निवडा)
- School Details (आता तुम्ही निवडलेल्या शाळेची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल)
- Standard wise Age Rule and Vacancy Details
- Total Strength (इयत्तेचा एकूण पट संख्या)
- RTE 25% Seats (त्या शाळेत RTE च्या जागा)
- Vacancy (यामध्ये तुम्हाला दिसेल अजून किती जागा शिल्लक आहे)
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलाचा ज्या शाळेत प्रतीक्षा यादीत नाव असेल ती शाळा शोधून सध्या त्या शाळेत किती जागा रिक्त आहे? त्यावरून तुमचा वेटिंग लिस्ट मधील नंबर आणि शाळेतील असणाऱ्या रिक्त जागा पाहून एक अंदाज लावू शकता. दिनांक 19 जून या तारखेला अजून मुदत मिळणार का? किंवा रिक्त असलेल्या जागांसाठी इतर मुलांना संधी दिली जाणार याबाबत लवकरच RTE पोर्टल वर अपडेट माहिती मिळेल.