Dearness Allowance hike news : अखेर! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ! वित्त विभागाने जारी केला शासन निर्णय...

State Government Employees DA Hike : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4 टक्क्याने वाढ करण्यात आली असून आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के करण्यात आला आहे 1 जानेवारी 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता देण्याचा महत्त्वाचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ! 

State Government Employees Da Hike

राज्य शासकीय व कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या इतर पात्र दरात दिनांक 1जानेवारी 2023 पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाने आज दिनांक 30 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.

त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना आता  38 % वरून 42 % प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. हा महत्वाचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी, 2023 मिळणार लाभ

शासनाने असे आदेश दिले आहे की, दिनांक 1 जानेवारी, 2023 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्याचा दर 38 % वरून 42 % करण्यात यावा. 

सदर महागाई भत्तावाढ दिनांक 1 जानेवारी, 2023 ते दिनांक 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माहे जून 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्याबाबत आदेश निर्गमित केले आहे.

State Government Employees Da Hike

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहणार आहे.

Previous Post Next Post