खूशखबर ! ‘MPSC’ च्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC PSI Result 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ पोलीस उपनिरीक्षक (PSI), सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचा निकाल एमपीएससीने जाहीर केला आहे. यामध्ये 10 हजार 38 उमेदवारांची निवड झाली आहे.

‘MPSC’ च्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेचा निकाल जाहीर

mpsc PSI result 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक ०५ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत संवर्गाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. [मोफत MPSC चे प्रशिक्षण मिळणार येथे पहा]

प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालातून मुख्य परीक्षेसाठी पात्र करण्यात आलेल्या उभयलिंगी उमेदवारांना, उभयलिंगी व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भातील शासनाच्या धोरणाच्या अधीन राहून तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाच्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. 

mpsc PSI result 2023

आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/ समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकाराह ठरतील.

परीक्षेचा निकाल PDF यादी पहा

राज्यातील तरुणांना MPSC चे मोफत प्रशिक्षण
कंत्राटी कर्मचारी वेतन वाढ पहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारचा निर्णय पहा

सरकारी नोकरीच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post