7th Pay Commission : AICPI ची आकडेवारी जाहीर, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ होणार, कितीने वाढणार पगार? पहा..

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच कर्मचाऱ्यां पगारात वाढ होणार आहे. खरं तर, कामगार मंत्रालयाने (AICPI index) निर्देशांकाची मे महिन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. दिनांक 30 जून 2023 रोजी निर्देशांकाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारी नुसार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या DA (महागाई भत्त्यात) मोठी वाढ होण्याचे संकेत आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या इतर भत्त्यांचे दरही सुधारित केले जाणार आहेत. असे झाल्यास केंद्रातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

7th Pay Commission

आकडेवारी कोण जाहीर करते?

सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार? हे AICPI इंडेक्सच्या आधारे ठरवले जाते, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक All India Consumer Price Index (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याच्या शेवटच्या वर्किंग डेच्या दिवशी जाहीर केली जाते. हा निर्देशांक 88 केंद्रांसाठी आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे.

एप्रिलच्या निर्देशांकात वाढ

AICPI एप्रिलचा आकडा आधीच 134.02 अंकांपर्यंत वाढला आहे आणि आता मे महिन्यातील AICPI निर्देशांकाचे आकडे देखील प्रसिद्ध झाले आहेत. या आधारावर पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (Dearness Allowance) मध्ये बंपर वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. मे महिन्यात पुन्हा एकदा AICPI च्या आकडेवारीत वाढ झाली आहे. मे 2023 च्या AICPI CPI-IW आकड्यांनी 0.5 अंकांची वाढ नोंदवली आहे. म्हणजेच आता निर्देशांक 134.7 पर्यंत वाढले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येत्या सहामाहीसाठी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ निश्चित मानली जाते. त्यानुसार कर्मचाऱ्यांचा DA 46% टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो.

aicpi index latest news
aicpi index latest news

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ होणार

यापूर्वी, एप्रिलपर्यंतच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार निर्देशांक 134.2 पर्यंत होता. त्यानुसार महागाई भत्ता वाढीचा दर हा 45.06% होता. शुक्रवारी जाहीर झालेल्या मे महिन्याच्या आकडेवारीत वाढ झाल्याने महागाईची टक्केवारी आता 45.57% टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्देशाकांच्या आकडेवारीनुसार डीएमध्ये 46% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जूनची आकडेवारी जाहीर झाल्यांनतर कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जून महिन्याची आकडेवारी जुलै महिन्यात जाहीर होईल.

महागाई भत्ता वाढीचा दर

AICPI च्या निर्देशांकाच्या आकडेवारी नुसार जानेवारी 2023 पासून महागाई भत्याचे दर पुढीलप्रमाणे

  1. जानेवारी 2023 – 43.10%
  2. फेब्रुवारी 2023 – 43.80%
  3. मार्च 2023 – 44.49%
  4. एप्रिल 2023 – 45.06%
  5. मे 2023 – 45.57%

पगारात कितीने होणार वाढ?

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्यांचे मूळ वेतन 18000 आहे, त्यांना महागाई भत्ता 42% प्रमाणे 7560 रुपये मिळतात. जर सध्याच्या निर्देशांकानुसार महागाई भत्ता 46% दरवाढ केल्यास महागाई भत्ता वार्षिक 8280 रुपये होईल, तर दरमहा वेतनात 720 रुपयांची वाढ होऊ शकते. [मूळ वेतनानुसार हे आकडे बदलतील]

तुमच्या मूळ वेतनानुसार पगारात एवढी वाढ लगेच पहा 

Previous Post Next Post