IBPS Clerk Recruitment 2023 : सरकारी बँकामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! IBPS कडून तब्बल 4000+ जागांसाठी मेगा भरती; पात्रता,वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज...

IBPS Clerk Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, आयबीपीस Institute of Banking Personnel Selection (IBPS) Clerk XIII पदाच्या एकूण 4045 रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे, आवश्यक पात्रता, भरतीचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज कोठे व कसा करावा? सविस्तर पाहूया..

सरकारी बँकामध्ये 4000+ रिक्त जागांसाठी मेगाभरती

ibps clerk recruitment 2023


IBPS भरती 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार एकूण 4045 रिक्त जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. IBPS Clerk XIII पदाची पात्रता पूर्ण करण्याऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून, जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया.

आवश्यक पात्रता

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे. किंवा त्यास समकक्ष शिक्षण संस्थेतील किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण   केलेलं असाव.

वयोमर्यादा: उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे असणे आवश्यक आहे.

आयबीपीयस भरतीच्या महत्वाच्या तारखा (वेळापत्रक) - IBPS Clerk Recruitment 2023 Schedule

  1. ऑनलाईन अर्ज - 1 जुलै ते 21 जुलै 2023
  2. ऑनलाईन फी भरणे - 1 जुलै ते 21 जुलै 2023
  3. पूर्व परीक्षा कॉल लेटर - ऑगस्ट 2023
  4. ऑनलाइन पूर्व परीक्षा (Preliminary Exam) - ऑगस्ट/ सप्टेंबर 2023
  5. परीक्षेचा निकाल - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2023
  6. मुख्य परीक्षेसाठी कॉल लेटर - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2023
  7. ऑनलाइन मुख्य परीक्षा - ऑक्टोबर 2023
  8. Provisional allotment - एप्रिल 2024
IBPS Clerk Recruitment 2023

नोट - उमेदवारांनी भरतीच्या प्रत्येक अपडेट साठी IBPS च्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर भेट द्यावी.

IBPS क्लार्क भरतीसाठी ऑनलाईन अर्ज असा करा - How To Apply IBPS Clerk Exam 2023

स्टेप 1: अधिकृत वेबसाइट- ibps.in ला भेट द्या [अधिकृत डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.]
स्टेप 2: होम पेजवरील 'CRP Clerk' लिंकवर क्लिक करा (एक नवीन पेज ओपन होईल)
स्टेप 3: CRP क्लार्कसाठी अर्ज लिंकवर क्लिक केल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करा.
स्टेप 4: आता तुमचे मूलभूत तपशील जसे की नाव, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता आणि आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
स्टेप 5: नोंदणी केल्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
स्टेप 6: आता अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 7: Save करा, सबमिट बटनावर क्लिक करा 
स्टेप 8 : ऑनलाईन फी भरा
स्टेप 9: तुमचा अर्ज डाउनलोड करा आणि जतन करून ठेवा.

IBPS Clerk परीक्षेचे स्वरूप 2023

IBPS Clerk Recruitment



Previous Post Next Post