Ycmou Online Admission 2023-24 : YCMOU ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु; वेळापत्रक, माहितीपुस्तिका येथे पहा..

Ycmou Online Admission 2023 24 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) प्रवेश प्रक्रिया २०२३ २४ सुरु झाली असून, याबाबत विद्यापीठाने अधिकृत नोटिफिकेशन जारी केले आहे, त्यानुसार कृषी शिक्षणक्रम, बी. एड., बी.एड. (विशेष), एम.बी.ए. (प्रथम वर्ष) इ. शिक्षणक्रमांव्यतिरिक्त इतर सर्व शिक्षणक्रमांची सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक १ जुलै २०२३ पासून सुरु झाली आहे.

YCMOU ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

Ycmou Online Admission 2023 24

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार एक सूचनापत्रक जारी केले आहे. त्यानुसार Ycmou Online Admission 2023-24 करिता कृषी शिक्षणक्रम, बी. एड., बी.एड. (विशेष), एम.बी.ए. (प्रथम वर्ष) इत्यादी शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुढील वेळापत्रकाप्रमाणे सुरू करण्यात आली आहे.

YCMOU ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक

ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब | शुल्क भरण्याची मुदत - दिनांक ०१.०७.२०२३ ते दिनांक ३१.०७.२०२३ पर्यंत (संध्याकाळी ११.५९ वाजेपर्यंत)

प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्यता मुदत - दिनांक ०५.०७.२०२३ ते ०३.०८.२०२३ पर्यंत (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

प्रवेश घेऊ इच्छिणारया विद्यार्थ्याने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करण्यास कळविण्यात आले आहे. [RTE 25% प्रवेश अपडेट येथे पहा]

Ycmou Online Admission 2023 24

विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) २०२३-२४ या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. [YCMOU अधिकृत वेबसाईट]

IBPS कडून 4000+ जागांसाठी जाहिरात लगेच पहा
सरकारी निवासी शाळेत 4 हजारहून अधिक जागांसाठी भरती पहा

तुमच्या मूळ वेतनानुसार पगारात एवढी वाढ लगेच पहा 

Previous Post Next Post