RTE Admission 2023 :आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या 7 हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेश घेण्यासाठी उरले शेवटचे दोन दिवस...

RTE 25% Admission 2023 : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023 24 अंतर्गत मुलांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत, RTE च्या तिसऱ्या फेरीत राज्यातील 8 हजार 826 बालकांना प्रवेशाची संधी मिळाली आहे, मात्र अद्यापपर्यंत 7 हजारहून अधिक जागा रिक्त आहेत, या बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक 7 जुलै 2023 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश आतापर्यंत काय झाले?

RTE 25 Admission

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार, आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत राज्यातील खाजगी नामांकित शाळेत बालकांना मोफत प्रवेश देण्यात येतो. यंदा शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता जानेवारी 2023 पासूनच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती.

त्यानुसार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी आरटीई ऑनलाइन सोडत (लॉटरी) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते.

त्यानुसार 94 हजार 700 मुलांची दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी लॉटरीमध्ये निवड करण्यात आली होती, आणि 81 हजार 129 मुलांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली, त्यानुसार कागदपत्रे पडताळणी करून 64 हजार 76 मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.

त्यानंतर दुसऱ्या फेरीत प्रतीक्षा यादीतील 81 हजार 129 विद्यार्थ्यांपैकी रिक्त जागा नुसार प्राधान्य क्रमाने अनुक्रमे 25 हजार 898 मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे होती. त्यापैकी 13 हजार 700 मुलांचे प्रवेश निश्चित झाले.

आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत प्रतीक्षा यादीतील (2nd) यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये 8826 मुलांची निवड करण्यात आली असून, आतापर्यंत 1625 बालकांचे प्रवेश निश्चित झाले असून, प्रवेश घेण्यासाठी अजून शेवटचे दोन दिवस (दि.7) जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या रिक्त जागा असण्याची अनेक कारणे

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राज्यामध्ये राबविण्यात येते. त्यामध्ये प्राप्त अर्जानुसार लॉटरी काढण्यात येते, त्यामुळे बऱ्याच पालकांना मनासारखी शाळा मिळू न शकल्यामुळे बहुतांश पालकांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तर अनेक पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करते वेळी अर्जात नमूद केलेले कागदपत्रे, लॉटरी जाहीर झाल्यानंतर पडताळणी समितीकडे देऊ शकले नाहीत, यासाठी शासनाने वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. तरीदेखील काही पालक कागदपत्रे अभावी यापासून वंचित राहिले. त्यामुळे प्राधान्यक्रमाने पुढील मुलांना RTE प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील 79401 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या 7 हजाराहून अधिक जागा रिक्त

सद्यस्थितीत RTE प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीतील 8826 मुलांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे, मात्र अद्यापपर्यंत RTE पोर्टल वरील आकडेवारीनुसार 1625 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहे. अजूनही राज्यात 7201 रिक्त जागा असून, प्रवेश घेण्यासाठी दिनांक 7 जुलै 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तेव्हा निवड झालेल्या मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश लवकरात लवकर निश्चित करून घ्यावे.

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post