How To Check Vehicle Challan Online : तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का? जाणून घेण्यासाठी 'या' सोप्या Steps Follow करा..

How To Check Vehicle Challan Online : बऱ्याचदा आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होते, अशावेळी आपल्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढून दंड आकारण्यात येतो, मात्र ई-चलन कारवाई झाली आहे किंवा कसे ? हे जाणून घेण्यासाठी तसेच ई-चलनचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी किंवा ई-चलन संदर्भात काही तक्रार असल्यास जाणून घेण्यासाठी कसे व कोठे पहावे? याविषयाची महत्वाच्या माहितीसाठी सविस्तर वाचा..

How To Check Vehicle Challan Online

दरमहा पाळा सुरक्षा सप्ताह - Safety Week

रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी शासन सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहने चालवणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळल्यास अपघात होणार नाहीत. रस्ता सुरक्षा ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया असून, महाविद्यालय व विद्यापीठ परिसरात दर महिन्याला रस्ता सुरक्षा सप्ताह (Safety Week) पाळण्याचे ठरविण्यात आले आहे.

इन्कम TAX बाबत जाणून घ्या

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा - Follow Traffic Rules,  Avoid Accidents

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. योग्य पध्दतीने सीट बेल्ट लावणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे, लेनची शिस्त पाळणे यासारख्या बाबींचा अवलंब करावा, जेणेकरून ई-चलनाव्दारा होणारी कारवाई टाळता येईल.सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर e-challan द्वारे कारवाई महाराष्ट्र पोलीसांकडून करण्यात येत आहे. त्यांना सहकार्य करावे.

महामार्ग सुरक्षा (Highway Safety) पथकाचे Twitter account @HSPMaharashtra या नावाने चालू करण्यात आले असून, महामार्ग सुरक्षा पथकामार्फत #MahaRastaSuraksha, #MahaRoadSafety, #Highwaysafety या हॅशटॅगच्या माध्यमातून राज्यातील वाहतुकीबाबतच्या घडामोडीबाबतची माहिती दिली जात असल्याचे गृह विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने कळविले आहे.

एसटी महामंडळाचा मोफत प्रवास बातमी पहा

तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का हे कसं पाहाल? - How To Check Vehicle Challan Online

कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर E-challan कारवाई झाली आहे किंवा कसे, हे जाणून घेण्यासाठी तसेच ई-चलनचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी किंवा ई-चलन संदर्भात काही तक्रार असल्यास https://mahatrafficechallan.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन गृह विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.

  • Steps 1 - सर्वप्रथम https://mahatrafficechallan.gov.in  या वेबसाईट ला भेट द्या.
  • Steps 2 - तिथे तुम्ही गाडी नंबर (Vehicle No) किंवा चलन नंबर (Challan No) हा पर्याय निवडा
  • Steps 3 - त्यांनतर Last 4 Digits Of Chassis/Engine No टाकून I'm Not a Robot वर क्लिक करा.
  • किंवा तुम्ही Challan No पर्याय निवडला असेल तर चलन नंबर टाका आणि I'm Not a Robot वर क्लिक करा.
How To Check Vehicle Challan Online

अशाप्रकारे तुम्ही वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे किंवा नाही हे पाहू शकता.

जुने वाहन खरेदी करण्यापूर्वी हे अवश्य तपासा..

प्रत्येक नागरिकाने जुने वापरते वाहन खरेदी करण्यापूर्वी त्यावर झालेली  E-challan कारवाई, ई-चलनाचा भरणा झाल्या बाबतची माहिती, याची खात्री करावी. वाहन चालक ज्या रस्त्यावरून वाहन चालवित आहे, त्या रस्त्यावरील वेग मर्यादेची खात्री करून वाहनाची वेग मर्यादा पाळावी, अन्यथा  E-challan कारवाई होवू शकते. वाहन चालवित असताना आपण नेहमी CCTV कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आहात याची दक्षता घ्यावी.

Previous Post Next Post