ITR Filing 2023 : इन्कम टॅक्स ITR रिटर्न फाइल करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी; पगारदार व्यक्तीसाठी आयकर स्लॅब पहा..

ITR Filing 2023 : सध्या नोकरदार वर्ग आणि व्यावसायिकांमध्ये आर्थिक वर्ष 2022 23 च्या वार्षिक उत्पन्नावर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याबाबत चर्चा सुरू आहे, इन्कम टॅक्स विभागाकडून ITR म्हणजेच Income Tax Return फाईल करण्यासाठी 31 जुलै 2023 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे, मात्र बऱ्याच वेळा इन्कम टॅक्स भरणे आणि इन्कम टॅक्सची रिटर्न फाईल करणे यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा गोंधळ उडतो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण याविषयीची सविस्तर माहिती पाहूया...

इन्कम टॅक्स भरणे आणि ITR रिटर्न फाईल करणे यामधील फरक

Income Tax Slab For Fy 2023-24 For Salaried Person

देशातील प्रत्येक नागरिकांसाठी सरकारने ठरवून दिलेल्या वार्षिक उत्पन्नानुसार (Income Tax Slab) प्रमाणे इन्कम टॅक्स भरणे आणि त्यानंतर इन्कम टॅक्स ITR रिटर्न फाईल करणे आवश्यक असते.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर Income Tax Return (ITR) फाईल करणे म्हणजे हा एक प्रकारचा ITR फॉर्म असतो, त्यामध्ये आपण आपल्या आर्थिक वर्षातील उत्पन्न या फॉर्म मध्ये भरून केंद्र सरकारच्या आयकर विभागाला आपल्या उत्पन्नाविषयी माहिती देतो, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे होय.

आणि इन्कम टॅक्स भरणे म्हणजे आपण वर्षभरात मिळवलेल्या उत्पन्नावर, सरकारने ठरवून दिलेल्या इन्कम टॅक्स स्लॅब प्रमाणे जर त्यात आपण येत असेल, तर त्या टक्केवारी प्रमाणे टॅक्स भरणे म्हणजेच Income Tax भरणे होय.

 इन्कम टॅक्स जुनी कर प्रणाली - Income Tax Slab (Old)

  • उत्पन्न - कर दर
  • 0 ते 2.5 लाख रुपये - शून्य
  • 2.5 लाख ते 5 लाख - 5 %
  • 5 लाख ते 7.5 लाख - 10 %
  • 7.5 लाख ते 10 लाख - 15 %
  • 10 लाख ते 12.5 लाख - 20 %
  • 12.5 लाख ते 15 लाख - 25 %
  • 15 लाखांच्या वर - 30 %

 इन्कम टॅक्स नवीन कर प्रणाली  - Income Tax Slab (New)

आर्थिक वर्ष 2023- 24 च्या बजेट मध्ये प्रस्तावित केलेली कर प्रणाली पुढीलप्रमाणे...

  • उत्पन्न- कर दर
  • 0 ते 3 लाख - शून्य
  • 3 लाख ते 6 लाख - 5 %
  • 6 लाख ते 9 लाख - 10 %
  • 9 लाख ते 12 लाख - 15 %
  • 12 लाख ते 15 लाख - 20 %
  • 15 लाखांच्या वर - 30 %

पगारदार व्यक्तीसाठी आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर स्लॅब

पगारदार व्यक्तींसाठी (Income Tax Slab For Fy 2023-24 For Salaried Person) आर्थिक वर्ष 2023 24 करिता Income Tax Slab पुढीलप्रमाणे..

Income Tax Slab For Fy 2023-24 For Salaried Person

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कोणी करायला हवी - Income Tax Return File

आता पण पाहूया इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (Income Tax Return File) कोणी करायला हवी? इन्कम टॅक्स रिटर्न फाईल ही सरकारने ठरवून दिलेल्या उत्पन्न मर्यादा पेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक असते.

सध्याच्या नियमानुसार तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अवश्य इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला हवी.

साधारणपणे नोकरी किंवा व्यावसायिकांनी Income Tax Return File करणे गरजेचे असते, 2.5 लाखापेक्षा तुमचे उत्पन्न कमी असेल, तरी देखील तुम्ही ITR फाईल करू शकता, याचे बहुतांश फायदे आपल्याला मिळतात.

जसे की, ITR फाईल केल्यानंतर तुम्हाला होम लोन म्हणजेच गृह कर्ज घेण्यासाठी, एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच व्हिसा तयार करण्यासाठी, क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अशा अनेक कामांसाठी तुम्ही जर ITR फाईल केलेली असेल तर तुमची विश्वासार्हता वाढते.

विशेष म्हणजे जरी तुम्ही इन्कम टॅक्स साठी करपात्र नसाल पण यदाकदाचित जर तुमचा TDS कापला गेला असेल, तर तुम्ही ITR रिटर्न फाईल करून टॅक्स रिफंड कर परतावा मिळू शकता.

तसेच तुम्ही Tax Saving गुंतवणूक केलेली असेल आणि जास्त Tax कापला गेला असेल अशाही परिस्थितीत तुम्ही रिटर्न फाईल करून पैसे परत मिळू शकता असे असंख्य फायदे Income Tax Return File केल्यामुळे आपल्याला मिळते.

तारांकित प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्यांना (SSA) शासन सेवेत कायम - सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे - शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ - कंत्राटी कर्मचारी नवीन धोरण PDF

इन्कम टॅक्स ITR फॉर्म कोणता भरायचा?

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फॉर्मचे काही प्रकार आहेत. इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती दिलेली असते.

ITR - Form 1 : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Form-1) हा तुम्ही नोकरदार वर्गासाठी, पेन्शनर, (Salary / Pension) ज्यांचे एकच घर आहे (One House Property) तसेच ज्यांना उत्पन्नाचे इतर काही स्रोत आहे (Other sources (Interest, Family Pension, Dividend etc.), कृषी उत्पन्न (Agricultural Income up to ₹ 5,000), आणि ज्यांचे कुटुंबाचं एकूण उत्पन्न 50 लाखांपर्यंत आहे, अशांसाठी ITR Form-1 हा फॉर्म ऑनलाइन भरता येतो. 

ITR 1

ITR - Form 2 : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Form-2) ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त आहे, तसेच ITR-1 साठी पात्र नसलेले, कंपनीचे डायरेक्टर , शेअरविक्रीतून तुम्हाला फायदा किंवा तोटा झाला आहे, एकापेक्षा जास्त घरं असतील तसेच इतर देशात काही मालमत्ता किंवा उत्पन्न आहे, तर ITR -2 हा फॉर्म भरायला हवा.

ITR -Form 3 : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Form-3) हा फॉर्म ज्यांचे व्यवसायातून उत्पन्न मिळते, तसेच ITR-1, ITR-2 or ITR-4 भरण्यासाठी पात्र नसलेले ITR -Form 3 भरू शकता.

ITR 2 3

ITR - Form4 : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Form-4) सुगम हा फॉर्म भागीदारी कंपनीसाठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाखापेक्षा कमी आहे, किंवा ज्यांचा छोटा व्यवसाय आहे. आयकर कायदा 1961 च्या कलम 44AD, 44ADA, 44AE अंतर्गत संभाव्य उत्पन्न योजनेचा पर्याय निवडलेल्याना हा फॉर्म भरावा लागतो.

ITR 4

ITR भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

  1. फॉर्म 16 (A&B) - तुमच्या ऑफिस, कंपनी कडून देण्यात येतो.
  2. फॉर्म 26 (A) तुम्ही हा फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.
  3. TDS Certificates म्हणजे तुमच्या पगारातून दरमहा कापला गेलेल्या कराची माहिती
  4. वेगवेगळ्या गुंतवणुकांचा तपशील जसे PPF, विमा, मेडिकल पावत्या, भाडेकरार, देणगी, Interest Earned On Bank Fixed Deposits, मालमत्ता किंवा शेअर्सच्या नफ्यातोट्याचा तपशील. गृहकर्ज काढलं असेल, तर त्याचे स्टेटमेंट
  5. नोट -  तुम्ही पगारदार (Salaried Person) असाल आणि तुम्ही ऑफिस किंवा तुमच्या कंपनीला गुंतवणूकीचा तपशील दिला असेल, तर तुमच्या फॉर्म 16 मध्ये या गोष्टी असतील.
  6. आधारकार्ड व पॅनकार्ड [तुमच्या आधार ला पॅन लिंक आहे का? पहा]

ITR File ऑनलाईन फॉर्म येथे भरा - Income Tax Return E Filing Portal

ITR (Income Tax Return File) ऑनलाईन करण्यासाठी तुम्ही चार्टर्ड अकाऊंटंट (CA) किंवा तज्ञांची मदत घेऊ शकता. किंवा संपूर्ण माहिती समजून घेऊन स्वत: देखील भरू शकता.

ऑनलाईन ITR भरण्याची Income Tax विभागाच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यासाठी येथे पहा संपूर्ण माहिती..

Income Tax Return E Filing Portalhttps://eportal.incometax.gov.in/
Income Tax Official Website - https://www.incometax.gov.in/

तुम्ही आधा-पॅन लिंक आहे का? येथे चेक करा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना (SSA) शासन सेवेत कायम
NMMS शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज

सरकारी नोकरीच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.



Previous Post Next Post