Sarathi Scholarship For Maratha : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'विशेष' शिष्यवृत्ती योजना! सारथी शिष्यवृत्ती योजनेत वार्षिक 9600 रुपये मिळणार; पात्रता, अर्ज प्रक्रिया सविस्तर जाणून घ्या..

Sarathi Scholarship For Maratha : छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व १२ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती पाहूया..

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना कोणासाठी आहे?

Sarathi Scholarship For Maratha

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवर NMMS परीक्षा शिष्यवृत्तीच्या धर्तीवर सारथी शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२ पासून लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील NMMS ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेले, पण केंद्र सरकारची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या गटातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता ९ वी चे इयत्ता १२ वी पर्यंत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांचे मार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 या वर्षापासून सुरू केली आहे.

सारथी शिष्यवृत्ती - दरवर्षी मिळणार 40 लाख रुपये येथे पहा

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती किती मिळते?

सारथी संस्थेकडून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.

सारथी शिष्यवृत्ती इयत्ता नववी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात दरमहा 800 रुपये प्रमाणे प्रति व वार्षिक एकूण 9 हजार 600 शिष्यवृत्ती अदा केली जाईल.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती - आवश्यक पात्रता

इयत्ता ९ वी : NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या व इयत्ता ९ वीमध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र समजण्यात येते. [NMMS संपूर्ण माहिती येथे पहा]

इयत्ता १० वी : मध्ये नियमित शिकत असणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांनी इयत्ता ९ वी मध्ये ५५% गुणासह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.

इयत्ता ११ वी : मध्ये शिकत असेलल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी मध्ये ६०% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच सारथी शिष्यवृत्ती योजना आहे.

हे ही वाचा - जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज - कंत्राटी कर्मचारी नवीन धोरण PDF - नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ शिक्षकांना दिलासा - मोफत गणवेश बाबत मोठा निर्णय - कंत्राटी कर्मचारी निर्णय पहा

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती - आवश्यक कागदपत्रे

  1. विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना खालील लिंकवर दिलेला आहे. 
  2. मुख्याध्यापकांचे / प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र.
  3. विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील सन २०२३ २४ या सालातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत.
  4. विद्यार्थ्याच्या आधार कार्डची सत्यप्रत.
  5. विद्यार्थ्याचे स्वतःचे नावे बँक खाते असलेल्या पासबुकाच्या पहिल्या पानाची सत्यप्रत (नाव, खाते क्रमांक, IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.)
  6. इयत्ता १० वी च्या विद्याथ्यांनी इयत्ता ९वी च्या वार्षिक परीक्षा ५५% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुण पत्रिकेची सत्यप्रत जोडावी.
  7. इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी च्या वार्षिक परीक्षेत ६०% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुण पत्रिकेची सत्यप्रत जोडावी.
  8. NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक / निकालपत्रक.
  9. एकत्रित कुटुंबातील शिधापत्रिका (रेशन कार्ड) सत्यप्रत
  10. इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावे.

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती - अर्ज

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन स्वरुपात दिलेल्या अर्ज नमुन्यात अर्ज भरावा लागतो, आणि आवश्यक कागदपत्रे व  मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे शिफारस पत्र जोडून गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना व शिफारस पत्र येथे PDF Download करा.

सारथी शिष्यवृत्ती अर्जाचा नमुना PDF येथे पहा

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस अर्ज करू इच्छिणाऱ्या लक्षित गटातील पात्र इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व ११ वी साठी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना, मुख्याध्यापक शिफारस पत्र व अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या सूचना, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर सूचना देण्यात आली आहे. अधिकृत परिपत्रक येथे पहा..

Previous Post Next Post