Govt Jobs 2023 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभागामध्ये सरकारी नोकरीची उत्तम संधी! दहावी ते पदवी पात्र उमेदवारांनी येथे करा ऑनलाईन अर्ज...

Govt Jobs 2023 : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखालील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील एकूण १११ जागांची सरळसेवा भरतीची जाहिरात निघाली आहे, दहावी ते पदवीधर आणि आवश्यक इतर पात्रता धारक इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे, सविस्तर जाहिरात पाहूया...

पदाचे नाव व जागा तपशील

Govt Jobs 2023

 1. क्रीडा अधिकारी, गट ब (अराजपत्रित) - ५९ पदे
 2. क्रीडा मार्गदर्शक, गट ब (अराजपत्रित) - ५० पदे
 3. निम्नश्रेणी लघुलेखक, गट ब (अराजपत्रित) - १ पद
 4. शिपाई, गट ड - १ पद

वेतनश्रेणी

 1. क्रीडा अधिकारी - S-१४ (३८६००- १२२८००) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते
 2. क्रीडा मार्गदर्शक - S-१४ (३८६००- १२२८००) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते
 3. निम्नश्रेणी लघुलेखक - S-१४ (३८६००- १२२८००) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते
 4. शिपाई - S-१ (१५०००-४७६००) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

निवडीची पद्धत

 • वरील सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येणार आहे.
 • संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. 
 • गुणवत्ता यादीत येण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

परीक्षेचे स्वरूप

क्रीडा अधिकारी व शिपाई

ऑनलाईन पध्दतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात, प्रत्येक प्रश्नास एकूण १०० प्रश्न) जास्तीत जास्त २ गुण (२०० गुण) (शैक्षणिक पात्रतेस अनुसरुन मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ५० गुण) (परिक्षा कालावधी १२० मिनटे)

क्रीडा मार्गदर्शक व निम्नश्रेणी लघुलेखक

ऑनलाईन पध्दतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात, प्रत्येक प्रश्नास एकूण (६० प्रश्न) जास्तीत जास्त २ गुण (१२० गुण) (शैक्षणिक पात्रतेस अनुसरुन मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ३० गुण) (परिक्षा कालावधी- ९० मिनटे) ८० गुणांची व्यावसायिक चाचणी संचालनालयामार्फत घेण्यात येईल

शैक्षणिक अर्हता आणि अनुभव

क्रीडा अधिकारी

 1. सांविधिक विद्यापीठाच्या कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवीसह, मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
 2. नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
 3. शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण.  किंवा
 4. एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

क्रीडा मार्गदर्शक

 1. सांविधिक विद्यापीठाच्या कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
 2. नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी  किंवा
 3. तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
 4. शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा
 5. एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी)

 1. माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
 2. १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

शिपाई

 1. माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

परीक्षा शुल्क

 1. अराखीव (खुला) - १००० रुपये
 2. मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग रुपये. - ९०० रुपये
 3. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
 4. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत

 • परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
 • पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-baned) ऑनलाईन अर्ज https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक २२ जुलै, २०२३ ते दि. १० ऑगस्ट, २०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे.
 • विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही. याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील “भरती/ Recruitment" या टॅब वर भरतीसाठी लिंक व माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार प्रथमतः माहिती डाऊनलोड करुन घ्यावी व सदर माहिती संपूर्णपणे वाचून उपलब्ध लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन फॉर्म भरण्यात यावा.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षा विषयक माहिती, रिक्त पदाचा तपशील, आरक्षण व अर्हता तपशील आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, अभ्यासक्रम, इ. माहिती जाहिरातीमध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे. येथे क्लिक करा.


Previous Post Next Post