Sarathi Scholarship : विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार, दरवर्षी मिळणार 40 लाख रुपये, सारथी शिष्यवृत्ती योजना सविस्तर जाणून घ्या..

Sarathi Scholarship : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असून, देखील त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही, आता यासंदर्भात राज्य सरकारने 'सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती' (Sarathi Scholarship) योजना सुरु केली आहे, यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, सविस्तर वाचा..

परदेशात शिक्षणासाठी सारथी शिष्यवृत्ती योजना सुरु

Sarathi Scholarship

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. 

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी 'सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती' (Sarathi Scholarship) योजना सुरु करण्याबाबत दिनांक ४ जुलै २०२३ रोजीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तसा शासन आदेश दिनांक २० जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. 

सारथी शिष्यवृत्ती - दरवर्षी मिळणार 40 लाख रुपये 

परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यास खालील लाभ देण्यात येतील.

  1. परदेशातील शैक्षणिक संस्थेची संपूर्ण शिक्षण फी
  2. अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गानी इकॉनॉमी क्लास (Economy Class) विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह) 
  3. निर्वाह भत्ता
  4. वैयक्तिक आरोग्य विमा
  5. पदव्युत्तर पदवी/पदविकासाठी एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी रुपये ३० लाखाच्या मर्यादेत,  
  6. पीएचडीसाठी प्रतिविद्यार्थी प्रतिवर्षी रुपये ४०.०० लाखाच्या मर्यादेत शाखा/अभ्यासक्रम निहाय मार्गदर्शक तरतूदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येणार आहे.

सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी/पदविका व पीएचडी (Sarathi Scholarship For Phd) अभ्यासक्रमासाठी QS World Ranking मध्ये २०० च्या आत रॅन्कींग असलेल्या शैक्षणिक संस्था/विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेतील अशा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
  • सदरची योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत 'सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना' या नावाने शैक्षणिक वर्ष २०२३ २४ पासून राबविण्यात येणार आहे.
  • सदर योजना महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या जातीतील विद्यार्थ्याकरिता लागू राहील. पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सारथी संस्थेकडून ऑनलाईन स्वरुपात करणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती शाखा निहाय विभागणी

Sarathi Scholarship

आवश्यक शैक्षणिक अर्हता 

  1. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५% गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  2. पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५% गुणांसहित पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 
  3. हा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा

  • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची वयाची कमाल ३५ वर्ष 
  • पीएचडी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांच्या वयाची कमाल ४० वर्ष वयोमर्यादा असावी.

सर्वसाधारण अटी व शर्ती 

  1. लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. 
  2. विद्यार्थ्याला परदेशातील QS world ranking मध्ये २०० च्या आत रॅकींग असलेल्या शैक्षणिक संस्था/विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.
  3. विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. तसेच त्यांने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.
  4. परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. सविस्तर येथे पहा

सारथी शिष्यवृत्ती अधिकृत वेबसाईट - https://sarthi-maharashtragov.in/

रुपये 35 हजार रुपयाची शिष्यवृत्ती योजना पहा

'सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना' - शासन निर्णय पहा

सातवा वेतन आयोगाची लेटेस्ट बातमी पहा
सरकारी नोकरीची संधी येथे पहा
तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का? चेक करा

Previous Post Next Post