MAHADES Sarkari Naukri : दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभागात 260 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज...

MAHADES Sarkari Naukri : अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत इयत्ता 10 वी ते पदवीधारक आणि आवश्यक इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2023 ते दिनांक 5 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आले आहेत. सविस्तर जाहिरात पाहूया..

अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभागात 260 जागांसाठी भरती

MAHADES Sarkari Naukri

अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील नामनिर्देशनाची रिक्त असलेली पदे भरण्याकरीता तब्बल 260 जागांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज हे दिनांक 15 जुलै 2023 ते दिनांक 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत उमेदवारांना भरता येणार आहे.

दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

अर्थ व सांख्यिकी संचालनालय अंतर्गत सहाय्यक संशोधन अधिकारी गट-ब, सांख्यिकी सहाय्यक गट-क आणि अन्वेषक गट- क या तीन पदांसाठी रिक्त असलेल्या 260 जागांसाठी भरती निघाली आहे. राज्यातील दहावी उत्तीर्ण ते पदवीधारक आणि आवश्यक इतर शैक्षणिक पात्रता धारक पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज भरू शकतात.

वेतनश्रेणी

  1. सहायक संशोधन अधिकारी, गट-ब : S-14 : 38600 - 122800
  2. सांख्यिकी सहायक, गट-क : S-10 : 29200 - 92300
  3. अन्वेषक, गट- क :  S-8 : 25500-81100

पदांचा तपशील व  रिक्त जागा

MAHADES

वयोमर्यादा

खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे (दोन वर्ष शिथिलता)
राखीव प्रवर्ग- 18 ते 43 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  1. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / अर्थमिती / गणितीय अर्थशास्त्र / वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  2. सांख्यिकी सहाय्यक गट क – मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / अर्थमिति / सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  3. अन्वेषक गट क – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी पास) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच वरील तीनही पदांसाठी संगणक हाताळणी वापराबाबतचे (MS-CIT) किंवा इतर त्यास समकक्ष परीक्षा उत्तीर्णे आवश्यक आहे.

कृषी विभागात सरकारी नोकरीसाठी अर्ज येथे करा

महत्वाच्या तारखा

  • जाहिरात - दिनांक 13 जुलै 2023
  • ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी - दिनांक 15 जुलै 2023 ते दिनांक 5 ऑगस्ट 2023
  • प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा संभाव्य दिनांक - परीक्षेपूर्वी 7 ते 10 दिवस
  • ऑनलाईन परीक्षेचा संभाव्य दिनांक - सप्टेंबर 2023

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप 

सहाय्यक संशोधन अधिकारी गट-बसांख्यिकी सहाय्यक गट-क पदांकरीता परीक्षेचा दर्जा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी 50 गुणांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ऑनलाईन परीक्षा 200 गुणांची राहील.

अन्वेषक, गट - क पदाकरीता परीक्षेचा दर्जा माध्यमिक शालांत 10 वी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी 50 गुणांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ऑनलाईन परीक्षा 200 गुणांची राहील.

सरकारी नोकरीची संधी पहा
कंत्राटी कर्मचारी संदर्भात लेटेस्ट न्यूज पहा

Previous Post Next Post