Latest Govt Jobs 2023 : दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, इथे करा ऑनलाईन अर्ज..

Latest Govt Jobs 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी कृषी विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे, कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अंतर्गत गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीची जाहिरात (Latest Govt Jobs Notifications) दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, या कृषी विभाग भरतीसाठी आता शासनाने ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक २२ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कृषी विभागात या पदांसाठी भरती सुरु

Latest Govt Jobs 2023

कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अंतर्गत विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील Group-C संवर्गातील वरिष्ठ लिपीक (Senior Clerk), सहाय्यक अधीक्षक (Assistant Superintendent), लघुटंकलेखक (Stenographer), लघुलेखक-निम्न श्रेणी (Stenographer (Lower Grade), लघुलेखक-उच्च श्रेणी)- (Stenographer (Higher Grade) या संवर्गातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

वेतनश्रेणी

krushi vibhag bharati

कृषी विभाग सरळसेवा भरतीस मुदतवाढ

कृषी विभागातील सरळसेवा भरतीची जाहिरात दिनांक ०३ एप्रिल २०२३ ते दि. ०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि ३० एप्रिल २०२३ पर्यंत होती. 

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या दि. ४ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या तसेच मागास प्रवर्गातील महिलांनी Non-Criminal Certificate सादर करण्याची अट रद्द केली आहे.

त्यामुळे या नवीन निकषानुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावर अर्ज करण्यासाठी नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Criminal Certificate ) नसणाऱ्या महिला उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदाकरीता अर्ज करता आलेले नाहीत, यासाठी ऑनलाईन अर्ज करता न आलेल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी आता दिनांक २२ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पदनिहाय आवश्यक  शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता

लघु टंकलेखक (Short Typist) 

  • माध्यमिक शाळा (SSC) परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास)
  • लघुलेखनाचा (शॉर्ट टायपिंग) वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट 
  • इंग्लिश टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 40  शब्द प्रति मिनिट किंवा 
  • मराठी टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट 
  • या पदासाठी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

लघुलेखक Stenographer (Lower Grade) 

  • माध्यमिक शाळा (SSC) परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास)
  • लघुलेखनाचा (शॉर्ट टायपिंग) वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट 
  • इंग्लिश टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 40  शब्द प्रति मिनिट किंवा 
  • मराठी टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट 
  • या पदासाठी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

लघुलेखक Stenographer (Higher Grade)

  • माध्यमिक शाळा (SSC) परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास)
  • लघुलेखनाचा (शॉर्ट टायपिंग) वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट 
  • इंग्लिश टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 40  शब्द प्रति मिनिट किंवा 
  • मराठी टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट 
  • या पदासाठी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

आवश्यक वयोमर्यादा 

सरकारी भरती नियमानुसार या पदासाठी किमान 18 ते 40  वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट)

ऑनलाईन अर्ज येथे करा

उमेदवारांनी ऑनलाईन  अर्ज सादर करण्यासाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा , तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना [ सर्व जाहिराती अधिकृत वेबसाईटवर डायरेक्ट लिंक पहा] संपूर्ण जाहिरात येथे पहा

Previous Post Next Post