Teachers Recruitment News : राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Teachers Recruitment News : अखेर राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षक भरती बाबत एक महत्वाची बातमी अशी आहे की, राज्याचे मा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मीडियाशी बोलताना राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती होणार असून, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक भरती केली जाणार असल्याची माहिती दिली. सविस्तर पाहूया...

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

Teachers Recruitment News

राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या आदेशान्वये शिक्षक भरतीवर स्थगिती आली होती. आता ही स्थगिती उठली असून, यांसदर्भात राज्याचे मा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. त्यामुळे आता शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती होणार

आता राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यात 50 हजार शिक्षक भरती केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक भरती होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले, तसेच ही शिक्षक भरती राज्यातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळांतील रिक्त पदानुसार होणार असून, यासंदर्भातला शासन निर्णय आजच काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सहा महिन्याची थकबाकी किती मिळणार? पहा.
मंत्रिमंडळ विस्तार यादी येथे पहा

केंद्राच्या PGI अहवालावर शिक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आलेख PGI (Performance Grading Index) अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची Grade घसरली आहे आणि शिक्षणात राज्य मागे पडले आहे. शिवाय' 2017-18, 19 मध्ये Level-1 वर असणारे महाराष्ट्र यंदा Level-3 पर्यंत खाली आले आहे. देशात पहिल्या 10 राज्यांत महाराष्ट्राचा 8 वा क्रमांक आहे. केंद्रीय. शिक्षण मंत्रालयाच्या पद्धतीनुसार, एकूण 10 ग्रेडमध्ये राज्यांची विभागणी केली आहे. आश्चर्य म्हणजे पहिल्या 5 ग्रेड मध्ये एकाही राज्याचा समावेश नाही. उर्वरित ग्रेडमध्ये चंदीगड प्रथम तर पंजाब दुसऱ्या स्थानी आहे.

यावर बोलताना शालेय शिक्षण मंत्री म्हणाले की, यावर्षीच्या मुल्यामापनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रगती दिसेल, कारण हे मूल्यमापन हे मागील वर्षीचे असून, या मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे हा बदल दिसून येत आहे. 

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्या प्रथम स्थानी असून, या जिल्ह्याने 600 पैकी 430 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे.[ सविस्तर अहवाल येथे पहा]
Previous Post Next Post