Education News : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 'PGI' निर्देशांकाचा अहवाल जाहीर;केंद्राच्या PGI अहवालात सातारा राज्यात अव्वल...

Education News : केंद्रीय शिक्षण मंत्रालयांच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने देशातील प्रत्येक राज्यांचा PGI (Performance Grading Index) नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाची घसरण झाली असून, गुणवत्ता आणि अध्ययन निष्पत्तीत महाराष्ट्र राज्य मागे पडले आहे. सविस्तर वाचा..

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने PGI निर्देशांकाचा अहवाल जाहीर

Performance Grading Index Education News

देशभरातील सुमारे 14 लाख 90 हजार शाळा, 95 लाख शिक्षक आणि विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेले सुमारे 26 कोटी 50 लाख विद्यार्थी यांना सामावून घेतलेली भारतीय शिक्षण व्यवस्था ही जगातील सर्वात मोठ्या शिक्षण व्यवस्थांपैकी एक आहे.  

केंद्रीय शिक्षण मंत्रालयांच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने देशातील प्रत्येक राज्यांचा PGI (Performance Grading Index) नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाची घसरण झाली असून, गुणवत्ता आणि अध्ययन निष्पत्तीत महाराष्ट्र राज्य मागे पडले आहे. 

राज्याची Level-1 वरून राज्याची Level-3 पर्यंत घसरण झाली आहे. PGI साठी 6 प्रकारचे निकष वापरले जातात. यामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता, उपलब्धता, पायाभूत सुविधा, समानता, प्रशासकीय प्रक्रिया आणि शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण अशा निकषांनुसार PGI ठरवला जातो.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आलेख PGI (Performance Grading Index) अहवालात महाराष्ट्रात सातारा जिल्ह्या प्रथम स्थानी असून, या जिल्ह्याने 600 पैकी 430 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे.

केंद्राच्या PGI अहवालात सातारा राज्यात अव्वल

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आलेख PGI (Performance Grading Index) अहवालात महाराष्ट्रात सातारा जिल्ह्या प्रथम स्थानी असून, या जिल्ह्याने 600 पैकी 430 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे.

सातारा जिल्ह्याने अध्ययन निष्पत्ती मध्ये 171 गुण तर वर्ग आंतरक्रियामध्ये 86 गुण, भोतीक सोयी सुविधांमध्ये 46 गुण, शालेय सुरक्षा व विद्यार्थी सुरक्षिततांमध्ये 35 गुण तर डिजीटल अध्ययनमध्ये 24 गुण व प्रशासकीय प्रक्रियेमध्ये 68 गुण मिळवले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा सलग तिसऱ्या PGI मध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्हानिहाय PGI गुणांकन पहा..

performance grading index maharashtra
Performance Grading Index

ग्रेडनुसार राज्य व गुण

महाराष्ट्र राज्याची Grade घसरली आहे आणि शिक्षणात राज्य मागे पडले आहे. शिवाय' 2017-18, 19 मध्ये Level-1 वर असणारे महाराष्ट्र यंदा Level-3 पर्यंत खाली आले आहे. देशात पहिल्या 10 राज्यांत महाराष्ट्राचा 8 वा क्रमांक आहे. केंद्रीय. शिक्षण मंत्रालयाच्या पद्धतीनुसार, एकूण 10 ग्रेडमध्ये राज्यांची विभागणी केली आहे. आश्चर्य म्हणजे पहिल्या 5 ग्रेड मध्ये एकाही राज्याचा समावेश नाही. उर्वरित ग्रेडमध्ये चंदीगड प्रथम तर पंजाब दुसऱ्या स्थानी आहे.

 1. चंडीगड - ६५९
 2. पंजाब - ६४७.४ 
 3. दिल्ली - ६३६.२
 4. केरळ - ६०९
 5. गुजरात - ५९९
 6. पुद्दुचेरी - ५९२.७
 7. तमिळनाडू - ५७०.४
 8. महाराष्ट्र - ५८३.२
 9. हरयाणा - ५७७.९
 10. राजस्थान - ५७७.५
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने  या आधी राज्यांसाठी शिक्षण व्यवस्थेचा कामगिरी वर्गवारी निर्देशांक (Performance Grading Index-PGI) तयार केला आणि संदर्भ वर्ष 2017-18 ते 2020-21 साठी अहवाल जारी केला. या राज्य कामगिरी वर्गवारी निर्देशांकाच्या यशावर आधारीत, सर्व जिल्ह्यांच्या कामगिरीची वर्गवारी करण्यासाठी, आता जिल्ह्यांसाठी 83-निर्देशक आधारीत PGI-D ची रचना करण्यात आली आहे. 

यामध्ये  जिल्ह्यांद्वारे ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून माहिती भरली जाते. PGI-D मुळे राज्याच्या शिक्षण विभागांना, शिक्षण व्यवस्थेत असलेली जिल्हा स्तरावरील तफावत ओळखण्यात आणि शिक्षण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करून आपली कामगिरी सुधारण्यात मदत याद्वारे मदत होते. निर्देशांकानुसार मिळालेले PGI गुणांकन, जिल्ह्याने कुठल्या बाबतीत  सुधारणा करणे आवश्यक आहे ते वेगवेगळ्या निर्देशकानुसार दर्शवते.

PGI Grading श्रेणी 

PGI साठी 6 प्रकारचे निकष वापरले जातात. यामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता, उपलब्धता, पायाभूत सुविधा, समानता, प्रशासकीय प्रक्रिया आणि शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण अशा निकषांनुसार PGI ठरवला जातो. हे सहा गट  पुढे 12 भागांमध्ये विभागले  आहेत. PGI-D ने जिल्ह्यांसाठी 10 श्रेणी निश्चित केल्या आहेत.  

उदा. दक्ष, ही सर्वोत्तम श्रेणी आहे. सहा गटांपैकी एका गटात किंवा एकंदर सर्व सहा गट मिळून ज्या जिल्ह्याला 90% पेक्षा जास्त गुण मिळतात त्यांना दक्ष ही श्रेणी दिली जाते.  दहा टक्क्यांपर्यंत गुण मिळणाऱ्या जिल्ह्यांना आकांक्षी-3 ही श्रेणी दिली जाते आणि ही श्रेणी सर्वात तळाची आहे.  

 1. दक्ष : ९४१ - १०००
 2. उत्कर्ष : ८४१ - ९४०
 3. अतिउत्तम : ८२१ - ८८०
 4. उत्तम : ७६१ - ८२०
 5. प्रचेष्टा १ : ७०७ - ७६०
 6. प्रचेष्टा २ : ६४१ - ७०० 
 7. प्रचेष्टा ३ : ५८१ - ६४०
 8. आकांशी १ : ५२१ - ५८०
 9. आकांशी २ : ५६१. - ५२० 
 10. आकांशी ३ : ४६१ - ४६०

शालेय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी नेमक्या कुठल्या क्षेत्रात बदल घडवून आणणे आवश्यक आहे ते प्राधान्य क्रमाने ठरवून सुधारणेची अधिकाधिक चांगली श्रेणी प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यांना मदत करणे हे PGI-D चे अंतिम उद्दिष्ट आहे. (PGI-D अहवाल पहा)

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२४ अर्ज येथे करा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन पहा
1 जुलै नुसार वेतनश्रेणी न्यूज पहा
महागाई भत्ता वाढ या महिन्यात मिळणार पहा


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा निर्णय पहा
'आरटीई' 25 टक्के प्रवेश अपडेट पहा

सरकारी नोकरीच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post