Contract Employees : गट संसाधन केंद्रांतील (BRC/CRC) कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मिळणार लाभ..

Contract Employees Salary Increase : राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात शासनाने वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, गटसंसाधन (BRC) व समूह संसाधन (CRC) केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत सुधारित आदेश दिनांक ६ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

गट संसाधन केंद्रांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

Contract Employees

राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमाच्या गाव पातळीवरील प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये गट संसाधन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये गट समन्वयक (BRC) एकुण १८० व समूह समन्वयक (CRC) एकुण ४८५ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.

महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पा.व स्व.) कंत्राटी कर्मचारी संघटनानी दिनांक ९ मार्च २०२३ रोजी शासनाकडे विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ लागू करणे, सदर कर्मचाऱ्यांना वैद्यकिय प्रसुती रजा व खर्च तसेच, अपघात विमा इ. लागू करणे, स्थगित करण्यात आलेले १०% मानधन वाढ लागू करणे, रिक्त पदे भरणे इ. मागण्या करण्यात आल्या आहेत.

दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मिळणार लाभ 

त्याअनुषंगाने शासनाने राज्यातील सद्यस्थितीत कार्यरत गट समन्वयक (BRC) व समूह समन्वयक (CRC) कर्मचाऱ्यांना मा. उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून मानधनामध्ये वाढ करुन ते रक्कम रुपये २५,००० या प्रमाणे दि. १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्याबाबत शासनाने मान्यता देण्यात आली आहे.

सदर कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ लागू झाल्यानंतर यापूर्वीचे शासन निर्णयातील तरतूदीनुसार अनुज्ञेय असणारी वार्षिक वेतनवाढ लागू राहणार नाही. तथापि, मा. उच्च न्यायालयाचे अंतिम आदेश सदर कर्मचाऱ्याना बंधनकारक राहतील असे कळविण्यात आले आहे.

दि. २ जून २०२३ रोजीचे कक्ष अधिकारी, पा.पु.स्व.वि. नुसार सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवांबाबत मा. उच्च न्यायालयाकडून घेण्यात येणारा निर्णय किंवा माहे मार्च, २०२४ यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा अंतिम निर्णय घेण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहे.[पत्र]

या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वाचे निर्णय पहा

कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज पहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदानुसार वेतन
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

सरकारी नोकरीच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post