Government Jobs : दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सहनिबंधक कार्यालयात 309 जागांसाठी मोठी भरती; सविस्तर जाणून घ्या..

Government Jobs : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, मुंबई विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) या कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील एकूण ३०९ जागांसाठी भरती करण्यात येत आहे, यामध्ये सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकार अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपीक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. सविस्तर जाहिरात पाहूया..

सहनिबंधक कार्यालयात 309 जागांसाठी मोठी भरती

Government Jobs

राज्यातील मुंबई सहनिबंधक कार्यालयातील गट-क संवर्गातील पदांसाठी दिनांक ७ जुलै २०२३ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. यामध्ये सहकार अधिकारी श्रेणी - १, सहकार अधिकारी श्रेणी-२, लेखापरीक्षक श्रेणी-२, वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी, निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक या पदांसाठी भरती होत आहे. तर यासाठी दहावी उतीर्ण ते पदवीधारक पास असणारे उमेदवार पदनिहाय पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. तब्बल एकूण ३०९ जागांसाठी मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ७ जुलै २०२३ ते अंतिम मुदत दिनांक २१ जुलै २०२३ पर्यंत आहे.

पदनिहाय वेतनश्रेणी 

सहकार अधिकारी श्रेणी - १, सहकार अधिकारी श्रेणी-२, लेखापरीक्षक श्रेणी-२, वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी, निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक या पदांसाठी पुढीलप्रमाणे वेतनश्रेणी लागू असणार आहे.

government jobs

आवश्यक शैक्षणिक पात्रता

१) सहकार अधिकारी श्रेणी - १

शैक्षणिक अहर्ता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह) / वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण

२) सहकार अधिकारी श्रेणी-२

शैक्षणिक अहर्ता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण

३) लेखापरीक्षक श्रेणी-२

शैक्षणिक अहर्ता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अर्कोटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अर्कोटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण

४) वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारी

शैक्षणिक अहर्ता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/ कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण

५) उच्चश्रेणी लघुलेखक

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • १२० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

६) निम्नश्रेणी लघुलेखक

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

७) लघुटंकलेखक

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • ८० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

निवडीची पद्धत

  1. निवडीची पद्धत : सर्व पदासाठी संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येणार आहे.
  2. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. 
  3. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 
  4. उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. 

व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ दिनांक व वेळापत्रक यथावकाश संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. 
संगणक आधारीत (Computer Based Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे

government jobs

ऑनलाईन अर्ज

  1. अर्ज सादर करण्याचे टप्पे : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) च्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करणे व खाते तयार करणे. १२.१.२ खाते तयार केले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
  2. सेवा प्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठीच अर्ज करणे.
  3. प्रस्तुत परिक्षा संवर्गनिहाय राज्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने एका संवर्गातील पदासाठी कोणत्याही एकाच विभागात अर्ज सादर करता येईल. सबब उमेदवारांनी अर्ज सादर करताना विभागाची निवड काळजीपूर्वक करावी.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे. १२.१.५ परिक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
  5. विहीत प्रमाणपत्र / कागदपत्रे अपलोड करणे
ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post