RTE Admission 2023 : 'आरटीई' 25 टक्के अंतर्गत 81 हजार बालकांचे प्रवेश निश्चित; मागील वर्षीच्या तुलनेत प्रवेश वाढले, राज्यात 13 हजार जागा रिक्त..

RTE Admission 2023 : 'आरटीई' 25 टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया 2023 अंतर्गत यंदा 81 हजार बालकांचे प्रवेश निश्चित झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत 2 हजार पेक्षा अधिक बालकांनी RTE प्रवेश घेतला आहे. मात्र राज्यात 13 हजार हून अधिक जागा ह्या रिक्त आहेत, तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 2 हजार 21 मुलांचे प्रवेश वाढले आहेत.

'आरटीई' 25 टक्के अंतर्गत 81 हजार बालकांचे प्रवेश निश्चित

Rte Admission 2023

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार, राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत खाजगी नामांकित शाळेत बालकांना मोफत प्रवेश देण्यात येतो. यंदा शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता जानेवारी 2023 पासूनच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती.

त्यानुसार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी आरटीई ऑनलाइन सोडत (लॉटरी) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते.

त्यानुसार 94 हजार 700 मुलांची दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी लॉटरीमध्ये निवड करण्यात आली होती, आणि 81 हजार 129 मुलांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली, त्यानुसार कागदपत्रे पडताळणी करून 64 हजार 29 मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.

त्यानंतर दुसऱ्या फेरीत प्रतीक्षा यादीतील 81 हजार 129 विद्यार्थ्यांपैकी रिक्त जागा नुसार प्राधान्य क्रमाने अनुक्रमे 25 हजार 898 मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे होती. त्यापैकी 13 हजार 685 मुलांचे प्रवेश निश्चित झाले.

आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत प्रतीक्षा यादीतील (2nd) यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये 8826 मुलांची निवड करण्यात आली असून, आतापर्यंत 3384 बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

अशाप्रकारे आतापर्यंत राज्यातील 81 हजार 98 बालकांचे प्रवेश निश्चित झाले असून, 13 हजार 602 जागा रिक्त आहेत, तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 2 हजार 21 मुलांचे प्रवेश वाढले आहेत.

Rte Admission 2023

आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या रिक्त जागा असण्याची अनेक कारणे

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राज्यामध्ये राबविण्यात येते. त्यामध्ये प्राप्त अर्जानुसार लॉटरी काढण्यात येते, त्यामुळे बऱ्याच पालकांना मनासारखी शाळा मिळू न शकल्यामुळे बहुतांश पालकांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तर अनेक पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करते वेळी अर्जात नमूद केलेले कागदपत्रे, लॉटरी जाहीर झाल्यानंतर पडताळणी समितीकडे देऊ शकले नाहीत, यासाठी शासनाने वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. तरीदेखील काही पालक कागदपत्रे अभावी यापासून वंचित राहिले. त्यामुळे प्राधान्यक्रमाने पुढील मुलांना RTE प्रवेशासाठी संधी देण्यात आली होती. आतापर्यंत राज्यातील 81,098 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
Previous Post Next Post