NMMS Result 2023 : NMMS परीक्षा शिष्यवृत्ती निवडयादी जाहीर, विद्यार्थी गुणवत्ता निवड यादी येथे पहा डायरेक्ट लिंक..

NMMS Result 2023 : एनएमएमएस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, निवड यादी 27 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 11 हजार ६८२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच NMMS निवड यादीतील विद्यार्थ्यांना शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. या शिष्यवृत्ती अंतर्गत (NMMS Scholarship) विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येते, आर्थिक पाठबळ

NMMS Result 2023

सन 2007 08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही Ministry of Human Resources, Government of India, New Delhi यांचे मार्फत राबविली जात आहे. 

आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे. 

प्राथमिक स्तरावर मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण सुरु करताना गळतीचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील प्रतिभावंत , हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात, मात्र त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्यांना पुढील शिक्षण सुरु ठेवण्यासाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS EXAM) आयोजन केले जाते.

NMMS शिष्यवृत्ती साठी महाराष्ट्र राज्यातून 11 हजार 682 शिष्यवृत्ती कोटा

21 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी 1 लाख 97 हजार 170 विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी 11 हजार 682 शिष्यवृत्ती कोटा MHRD नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. 

महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी 4 टक्के आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इयत्ता 7 वी व 8 वी ची विद्यार्थी संख्या व 12 ते 14 वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. सदरची निवडयादी व गुणवादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

एनएमएमएस शिष्यवृत्ती रक्कम दरवर्षी 12 हजार रुपये 

NMMS परीक्षेत पात्र ठरलेल्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी या चार वर्षासाठी प्रत्येक वर्षी 12 हजार रु (दरमहा 1000 रु) प्रमाणे Scholarship देण्यात येते. त्यानुसार एकूण चार वर्षात 48 हजार रुपये विद्यार्थ्यांस देण्यात येतात.

एनएमएमएस निकाल असा चेक करा

  • सर्वप्रथम https://www.nmms2023.nmmsmsce.in/Rst.aspx या अधिकृत वेबसाईट वर जा
  • त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या Enter correct seat no. & mother name या पर्यायावर ENTER SEAT NO आणि ENTER MOTHER NAME टाकून निकाल चेक करा

एनएमएमएस निवड यादी जाहीर - NMMS Result Selection List

NMMS EXAM परीक्षेचे आयोजन दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्राप्त गुणांची यादी 10 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आता 27 एप्रिल 2023 पासून NMMS Result Selection List निवडयादी व गुणांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://nmmsmsce.in/ या धिकृत संकेतस्थळावर यादी जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

    

Previous Post Next Post