Educator News : राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ! सुधारित मानधन न मिळाल्याबाबत सरकारचे स्पष्टीकरण ..

Educator News : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित केला आहे, मात्र अद्यापही काही शिक्षण सेवक वाढीव मानधनापासून वंचित आहे, यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात दिनांक 25 जुलै 2023 रोजी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, यासंबंधी राज्य सरकारने शिक्षण सेवकांना सुधारित मानधन न मिळाल्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे, सविस्तर वाचा..

राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ!

Educator News

प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित केला आहे, त्यानुसार पुढीलप्रमाणे वाढ करण्यात आली आहे.

  • उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 9000 वरुन 20,000 रुपये वाढ करण्यात आली आहे.
  • माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 8000 वरुन 18,000 रुपये वाढ
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात  6000 वरुन 16,000 रुपये वाढ

राज्यातील शिक्षण सेवकांना वाढीव मानधन देण्याचा निर्णय शासनाने माहे फेब्रुवारी 2023 मध्ये वा त्यादरम्यान घेतला असून या शासन निर्णयाची अंमलबजावणी माहे जानेवारी 2023 पासून करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सदरचा लाभ हा दिनांक 1 जानेवारी 2023 पासून देण्यात येणार आहे, मात्र पाच महिने उलटूनही अजून राज्यातील काही शिक्षण सेवकांना सुधारित मानधन न मिळाल्याबाबत  मा. सदस्य  श्री. अरुण लाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

सुधारित मानधन न मिळाल्याबाबत सरकारचे स्पष्टीकरण

मा. मंत्री शालेय शिक्षण दीपक केसरकर यांनी सांगितले की, शालेय शिक्षण व क्रीडा विभागशासन निर्णय, दिनांक ०७/०२/२०२३ नुसार शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षण सेवक यांची सुधारित मानधन बदलासंदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 

त्या सुविधेनुसार संबंधित मुख्याध्यापक यांनी आवश्यक दुरुस्तीसह मानधन बदलाचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रस्तावास आहरण व संवितरण अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर सुधारित मानधनानुसार शालार्थ प्रणालीमध्ये संबंधित कर्मचाऱ्याचे सुधारित दरानुसार मानधन अदा करण्यात येत आहे.

तथापि, ज्या शिक्षण सेवकांचे मानधन बदलाबाबतचे प्रस्ताव संबंधित मुख्याध्यापक यांनी सादर न केल्याने काही शिक्षण सेवक यांना सुधारित मानधन अदा करण्यास थोडा अधिकचा अवधी लागत आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील शिक्षण सेवकांना वाढीव मानधन मिळणार आहे.

हे ही वाचा - सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे - कंत्राटी कर्मचारी नवीन धोरण PDF कंत्राटी कर्मचारी निर्णय पहा - सारथी शिष्यवृत्ती खास योजना पहा

Previous Post Next Post