Video Making Competition : राज्यातील शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचं आयोजन, विजेत्याला मिळणार 50 हजाराचे रोख बक्षीस, स्पर्धेचे तपशील येथे पहा..

Video Making Competition 2023 : राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी, राज्यातील शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन, ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी खुल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे (Video Making Competition) आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेमध्ये तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर प्रत्येकी 84 पुरस्कार व रोख पारितषिके देण्यात येणार आहे, यामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे  50 हजार रुपयाचे रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, सविस्तर बातमी पाहूया..

राज्यभरात 2 लाख 89 हजार 560 शिक्षक तंत्रस्नेही

Video Making Competition

आजच्या 21 व्या शतकात ऑनलाईन शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शालेय शिक्षणापासून ते पदवी व व्यावसायिक शिक्षणात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा म्हणजेच संप्रेषण आणि तंत्रज्ञान (ICT) तंत्रज्ञानाचा सध्या मोठया प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. 

शैक्षणिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून ICT चा वापर होत आहे. यामुळे डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्त्व निर्माण झालेले आहे. (Video Making Competition)

राज्यामधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ अधिक सक्रीय होऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेमार्फत राज्यातील 2 लाख 89 हजार 560 शिक्षक हे तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आले आहे. 

7 व्या वेतन आयोग फरकाची रक्कम मे अखेर पर्यंत मिळणार

यामध्ये शैक्षणिक व्हिडीओ, मनोरंजक खेळ, AI/AR/VR वापर करून बनविलेले ई-साहित्य, कृतियुक्त PDF, आनंददायी PPT पोस्टर्स, प्रमाणपत्रे आदी. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले ई-साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे दिसून येते.

$ads={2}

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती आयोजन परिपत्रक PDF येथे पहा

राज्यातील शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचं आयोजन

शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजन करण्यात आले आहे.

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये इयत्ता 1 ली ते 12 वी आणि अध्यापक विद्यालयातील शैक्षणिक विषयावर व्हिडीओ निर्मितीसाठी ही स्पर्धा आयोजित केली. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

teacher Video Making Competition

विजेत्याला मिळणार 50 हजाराचे रोख बक्षीस

या स्पर्धेमधील विजेत्याला तालुका स्तरावर 84 पुरस्कार व प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर 84 पुरस्कार व प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तर राज्य स्तरावर देखील 84 पुरस्कार व प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकांसाठी 40 हजार तर तृतीय क्रमांकांसाठी 30 हजार रुपयाचे रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

तालुका व जिल्हा स्तरावरील रोख बक्षिसे व स्पर्धेचे तपशील येथे पहा
व्हिडिओ निर्मिती स्पर्धा शासन निर्णय येथे पहा 

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post