ऑनलाईन शिक्षण काळजी गरज | Online Shikshan Kalachi Garaj nibandh

 
Online Shikshan Kalachi Garaj nibandh

ऑनलाईन शिक्षण काळजी गरज | Online Shikshan Kalachi Garaj nibandh

ऑनलाईन हा शब्द काही सर्वांसाठी नविन नाही. ऑनलाईन म्हंटले कि, डोळ्यासमोर येते ते म्हणजे अंतरजाल , इंटरनेट आज प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे. 

कोरोनाच्या महामारी मुळे तर ऑनलाईन हा शब्द घरोघरी पोहचला आहे. आज प्रत्येक जण घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करू लागला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात देखील आता घरोघरी ऑनलाईन पद्धतीने केलेली शॉपिंग घरपोच सेवा मिळत आहे. 

एक काळ असा होता कि, साधा मोबाईल चा रिचार्ज करण्यासाठी दुकानात जावे लागत असे. मात्र आता मोबाईल मधूनच रिचार्ज , बिल भरणा किंवा ऑनलाईन व्यवहार हे सर्व काही सहज शक्य झाले आहे. 

मला तर आठवत देखील नाही की, मी बँकेत शेवटी व्यवहार करण्यासाठी कधी गेलो? सांगण्याचा उद्देश एवढाच आहे कि, ऑनलाईन मुळे सर्व काही शक्य झाले आहे. आणि नवनविन पर्याय पुढे येत आहे. त्यामध्ये कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागला आणि सर्वजन एकाच ठिकाणी स्थिर झाले.

आता शाळा कशा सुरु होणार? शासकीय , खाजगी कार्यालय कसे सुरु राहणार? प्रवास कसा करायचा? शॉपिंग , व्यवहार कसे करायचे? असे असंख्य प्रश्न सुरुवातीच्या काळात समोर आले. मात्र हळूहळू ऑनलाईन मुळे बरेचशे प्रश्न सुटले. मग त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे व्हर्च्युअल पद्धतीने मिटिंग , उद्घाटन , वेबिणार , कार्यशाळा , कार्यक्रम , ऑनलाईन व्यवहार , शॉपिंग हे सर्व सहज शक्य झाले. यासाठी वर्क फ्रॉम होम , लर्निंग फ्रॉम होम हे सहज शक्य होऊ लागले. हे सर्व कशामुळे? कोरोना आला म्हणून जग थांबले का? तर नक्कीच नाही. उलट एक संधी म्हणून याकडे जेव्हा आपण पाहू लागतो तेव्हा खूप सारे कष्ट आपले कमी होतात, आणि कमी वेळेत अधिक काम ऑनलाईन मुळे करता येणे शक्य होते. 

मग मुलांचे शिक्षण थांबले का? आज प्रत्येक घराघरात स्मार्टफोन आहेत, TV आहे. या माध्यमातून मुलांचे शिकणे कोरोनाच्या दरम्यान सुरु ठेवता आले. मग त्यामध्ये दूरदर्शन वाहिनी वरून टिलीमिली मालिका, ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम किंवा इयत्ता १० वी व १२ वी च्या मुलांसाठी विषयनिहाय ऑनलाईन तासिका यांचे टेलेव्हिजन द्वारे प्रेक्षेपण करण्यात आले. 

ऑनलाईन शिक्षण

शाळा बंद जरी असेल मात्र याद्वारे मुले शिकू लागली. यादरम्यान मुलांच्या समस्या त्यांच्या मनात येणारे प्रश्न यावर आमचे शिक्षक फोन वर , गृहभेटी देऊन समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच ज्या पालकांकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. अशा मुलांसाठी व्हर्चुअल क्लास , घेऊन अध्ययन-अध्यापन सुरु ठेवण्यास मदत झाली.

ऑनलाईन शिक्षणाचा प्रयत्न हा कोरोनापूर्वीच आपण केलेला आहे. मात्र याची गरज जास्त कोरोनाच्या दरम्यान जाणवली. आणि प्रत्येक शिक्षक मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.



कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत असताना आव्हाने हे असतातच आणि त्याशिवाय वाटेतले अडथळे दूर देखील करता येत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑनलाईन शिक्षण म्हणजे आज प्रत्येक मुलाची गरज बनली आहे. आव्हाने खूप आहेत. मात्र त्याचे उपचार देखील शोधून काढणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी नेटवर्क सुविधा किंवा काही पालकांकडे स्मार्टफोन उपलब्धता याची भविष्यात विचार करावा लागणार आहे. परंतु आज बहुसंख्य पालकांकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. 

कोरोनाच्या निमित्ताने ऑनलाईन शिक्षण किती प्रभावी ठरू शकते. हे नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये संशोधनात्मक अहवाल समोर येईलच, परंतु सध्या तरी ऑनलाईन शिक्षण पूरक वाटत नसेल, मात्र पर्याय म्हणून स्विकारणे गरजेचे बनले आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे वेळेची बचत होऊ लागली आहे. त्यासोबतच घरी सुरक्षित राहून मुले अभ्यास करत आहे. जी मुले वर्गात बोलत नसत, ती ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष अभिव्यक्त होत आहे. सर्वांसमोर काही मुले बोलत नसत ती आता बोलू लागली आहे. 

मुले आवडीचे शिक्षण घेताना दिसत आहे. एकही मुल असे नसणार कि, त्याला मोबाईल पालकांनी दिला नसेल, प्रत्येक मुल मोबाईल सोबत खेळत आहे. गरज आहे मुलांना योग्य मार्ग दाखवण्याची , म्हणजे मुलांना मोबाईल मधून शिकायचे यासाठी त्यांची मानसिकता तयार करणे  आवश्यक झाले आहे. 

व्हर्चुअल क्लास साठी आणि शैक्षणिक app च्या माध्यमातून अध्ययन होण्यासाठी मुलांना तशी सवय आणि मोबाईल मध्ये तशा सेटिंग्ज किंवा शिक्षणासाठीच फक्त मोबाईल उपलब्ध करता येत असेल तर उत्तम म्हणजे तसा दृष्टीकोन तयार करता येईल.

आज प्रत्येकाच्या घरोघरी मुलांच्या ऑनलाईन क्लास साठी मोबाईल , नेटवर्क. स्पीकर, हेडफोन यांची उपलब्धता आणि त्यांचा वापर कसा करायचा हे सहज मुले शिकून गेली. शैक्षणिक ई-लर्निंग साहित्य , शैक्षणिक व्हिडिओ , ppt खूप सारे सोर्स सध्या उपलब्ध आहे. आज प्रत्येक घटकातील मुल ऑनलाईन पद्धतीने आपले शिक्षण सुरु ठेवू शकतो. गरज आहे. योग्य अध्ययन-अध्यापन घडवून आणण्याची 

ऑनलाईन शिक्षण काळजी गरज (Online Shikshan Kalachi Garaj ) शाप कि, वरदान हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. पण या महामारी मध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचे शिक्षण सुरु ठेवण्यास मदत झाली आहे. भविष्यात ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी सध्या जाणवणाऱ्या समस्यावर उपचार करून अधिक प्रभावी अशी ऑनलाईन शिक्षण पद्धती बनवता येईल. सध्या तरी ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. 

Previous Post Next Post