समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीर मुलांचे शिक्षण | what is hearing impairment ?

कर्णबधीरत्व हे एक न दिसणारे दिव्यांग्त्व आहे. कर्णबधीर मुलाला पाहताच क्षणी आपण सांगू शकत नाही कि, या मुलाला कर्णबधीरत्व आहे. कर्णबधीर मुलांच्या वेगवेगळ्या स्वरूपानुसार त्यांचे श्रवणऱ्हास म्हणजेच ऐकण्याची क्षमता ही, प्रत्येकाची वेगवेगळी असते. 

वैद्यकीय दृष्टीने कर्णबधीरत्वाच्या स्वरूपानुसार या मुलांना उर्वरित श्रवण शक्तीचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी श्रवणयंत्र उपलब्ध करून दिले जातात. 

जेणेकरून मुलाचा वाचा व भाषेचा विकास होण्यास मदत होईल. ऐकायला येत नसल्यामुळे बोलता येत नाही. म्हणजे उच्चारस्थानात दोष नसताना देखील फक्त जन्मापासून कानावर एकही शब्द न पडल्यामुळे मुल बोलू शकत नाही. 

what is hearing impairment


मग यासाठी मुलांच्या कानाची तपासणी केली जाते. त्यास श्रवणचाचणी (Audiometery Test) असे संबोधले जाते. या द्वारे श्रावणालेख काढला जातो. आणि मग श्रवणयंत्र दिले जाते. श्रवणयंत्र दिले म्हणजे आता आपल्या प्रमाणे विद्यार्थी ऐकू शकेल असे नाही. 

यासाठी सुरुवातीच्या काही दिवसामध्ये मुलाला श्रवण प्रशिक्षण द्यावे लागते. कारण कर्णबधीर मुलासाठी आवाज हा अपिरीचीत असल्यामुळे श्रवणयंत्राच्या मदतीने ऐकण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये आवाज ओळखतो का? आवाजाची जाणीव होते का? दोन वेगवेगळ्या आवाजातील फरक ओळखता येतो का? आवाजाचे आकलन होते का? या श्रवणप्रशिक्षणाच्या पायऱ्या नुसार मुलाला आवाज ऐकण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच ऐकण्याबरोबर , लीपरीडिंग, सांकेतिक खुणा, हावभाव याद्वारे मुल शिकत असते. समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीरत्व मुलांचे शिक्षण याबाबत आजच्या लेखामध्ये माहिती पाहूया. 

{tocify} $title={Table of Contents}

समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीरत्व मुलांचे शिक्षण | what is hearing impairment ?

कर्णबधीरत्वाचे लवकरात लवकर निदान व उपचार

मुल कोणतेही असो, आईच्या गर्भात मुलाची वाढ होत असते. तेव्हापासूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य काळजी घेणे आवश्यक असते. मुल जन्माला आल्यानंतर आवश्यक त्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. 

लहान मुलाला आवाज ऐकायला येतो कि, नाही याचा अंदाज नक्की आईला येतो. मुल मोठ्या आवाजाला दचकते का? रडते का? आवाजाच्या दिशेने बघणे, मान वळवणे, प्रतिक्रिया देणे याबाबत जर मुल प्रतिसाद देत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन जायला हवे. त्यानुसार लहान मुलांची बेरा टेस्ट करून घेता येईल. 

याबाबत आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकरात लवकर निदान करून उपचार सुरु करावे. कारण जेवढ्या कमी वयात आपण उपचार सुरु करू त्यामुळे लहान वयातील ० ते ६ वयोगट हा मुलांच्या वाढीच्या दृष्टीने महत्वाचा काळ होय.

यामध्ये मुलाचा वाचा व भाषा विकास होण्यासाठी लवकरात लवकर निदान करून उपचार केल्यास त्यानुसार लहान मुलांचे कॉक्लीयार इम्पालांट शस्रक्रिया करता येईल. ज्याद्वारे मुलाला ऐकायला येऊ शकेल आणि मुलाचा वाचा व भाषा विकास साधण्यास मदत होईल. यासाठी लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे. आणि त्यानुसार उपचार करून घ्यावे.

उर्वरित श्रवण शक्तीचा जास्तीत जास्त वापर करणे. 

लवकरात लवकर निदान व उपचार सुरु झाल्यानंतर कर्णबधीर मुलाची उर्वरित श्रवण शक्तीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी योग्य श्रवणयंत्राची निवड करून ऐकण्याचे प्रशिक्षण म्हणजेच श्रवण प्रशिक्षण सुरु करावे. 

त्यामध्ये आवाज ओळखतो का? आवाजाची जाणीव होते का? दोन वेगवेगळ्या आवाजातील फरक ओळखता येतो का? आवाजाचे आकलन होते का? या श्रवणप्रशिक्षणाच्या पायऱ्या नुसार मुलाला आवाज ऐकण्याचे प्रशिक्षण दिले जाते. श्रवणप्रशिक्षण दिल्याने मुलाला ऐकायला येईल व ऐकायला आल्यामुळे मुल बोलण्याचा प्रयत्न करेल सोबतच वाचा व भाषा विकास साधण्यास मदत होईल. 

वाचा उपचार (Speech Theraphy)

मुलाला लहानपणापासून ऐकायला येत नसल्यामुळे बोलता येत नाही. यासाठी श्रवणप्रशिक्षणासोबत मुलाचे उच्चार बाहेर येण्यासाठी बोलण्याचा सराव करून घ्यावा लागेल. म्हणजेच  वाचा उपचार स्पीच थेरेपी देण्यात यावी. त्यामध्ये मुलाचे उच्चार स्थान , स्वर व्यंजन उच्चारस्थान कसे आहे? कोणते अक्षर उच्चारता येत नाही. शब्द वाचन करताना कोणते अक्षर गाळले जाते. यासंबंधी वाचा उपचार थेरेपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली स्पीच थेरेपी देण्यात यावी. यामुळे मुलाचा वाचा व भाषा विकास होण्यास मदत होईल.

कर्णबधीर म्हणजे काय? what is hearing impairment?

कर्णबधीरत्वाची व्याख्या

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार कर्णबधीरत्वाची व्याख्या 

कर्णबधीर (Hearing Impairment)

साधारणपणे 'कर्णबधीर' म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला ऐकायला येत नाही किंवा ऐकण्याची क्षमता कमी असते. अशा व्यक्तींना कर्णबधीर असे म्हणतात. ऐकायला न आल्यामुळे भाषा विकास होत नाही त्यामुळे बोलता येत नाही. काही व्यक्तींना ऐकायला येत नाही मात्र बोलता येते. विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींना बोलता येते मात्र ऐकण्याची म्हणजेच श्रवणशक्ती नष्ट होते किंवा कमी झालेली असते. काही व्यक्तींच्या बाबतीत अपघातामुळे कर्णबधीरत्व येते.

वैद्यकीयदृष्ट्या कर्णबधीर व्यक्तींची व्याख्या

ज्या व्यक्तीच्या चांगल्या कानाचा श्रवणऱ्हास 60 DB किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना ‘कर्णबधीर’ म्हणतात. {alertInfo}

 "deaf" means persons having 70 DB hearing loss in speech frequenciesin both ears.

ज्या व्यक्तीच्या दोन्ही कानाचा श्रवणऱ्हास 70 DB किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांना ‘Deaf’ म्हणून ओळखले जाते.{alertInfo}

"hard of hearing" means person having 60 DB to 70 DB hearing loss in speech frequencies in both ears.

SCERT SWADHYAY 2021 नोंदणी कशी करावी?

शालेय प्रवेश

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाला घराजवळच्या शाळेत शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. त्यामध्ये मुल कोणत्याही घटकातील असो, दिव्यांग मुलांना देखील आता सर्वसामान्य शाळेत शिक्षण घेणे सहज शक्य झाले आहे. 

लवकरात लवकर निदान व उपचार सुरु झाल्यानंतर मुलांचे शैक्षणिक प्रवेश घेणे आवश्यक असते. यासाठी आता प्रत्येक मुलाला घराजवळच्या शाळेत प्रवेश घेण्याचा हक्क मिळाला आहे. 

समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण (Inclusive Education) अंतर्गत दिव्यांग मुलांच्या गरजेनुरूप सहाय्यभूत सुविधा सर्वसामान्य शाळेत मुलांना मिळतात. त्यामध्ये दिव्यांग मुलांचा शोध , निदान व उपचार , शैक्षणिक सहाय्य , प्रशिक्षण , आरोग्य शिबिरे, अडथळा विरहीत वातावरण , आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमातील अनुकूलन , श्रवणयंत्र. कॉक्लीयार इम्पालांट शस्रक्रिया, विशेष शिक्षक , स्पीच थेरेपिस्ट यांचे विशेष सहाय्य समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीर मुलांना मिळते. यासाठी घराजवळ आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने कसलाही भेदभाव न करता शिक्षण घेण्याची संधी समावेशित शिक्षणामध्ये मिळते.

कर्णबधीर संपर्क पद्धती

कर्णबधीर मुलास इतरांशी संपर्क साधण्यासाठी खालील पद्धतींचा वापर केला जातो.

खुणांची पद्धत (Sign Language) -

या पद्धतीमध्ये वाचेचा अंतर्भाव मुळीच नसतो. हाताच्या खुणा व चेहऱ्यावरील हावभाव यांच्या मदतीने सवांद साधणे शिकविले जाते.

करपल्लवी (Karpallavi)

करपल्लवी या पद्धतीमध्ये हाताच्या बोटांनी निरनिराळी अक्षरे दर्शवली जातात. म्हणजेच प्रत्येक अक्षराला विशिष्ट हस्तचिन्हे दिलेली असतात.

मौखिक पद्धत 

या पद्धतीतून मुलांना आपले विचार मांडण्यास प्रोत्साहन दिले जाते. ओठांच्या हालचाली व चेहऱ्यावरील हावभावांचा भाषेसाठी उपयोग केला जातो.

क्युड स्पीच 

हि पद्धती बोटांच्या शास्रीय हालचालीवर आणि त्यांच्या निरनिराळ्या फितीवर आधारित आहे.

संपूर्ण संपर्क पद्धत 

या पद्धतीत खुणा , करपल्लवी व वाचा या सर्वांचा अंतर्भाव असतो. त्यांचे एकत्रीकरण असते.
उपरोक्त पद्धतीने कर्णबधीर मुलांसोबत / व्यक्तीसोबत संपर्क साधणे शक्य होते. 

समावेशित शिक्षणामध्ये विशेषतः कर्णबधीर मुलांसोबत संपूर्ण संपर्क पद्धती द्वारे अध्ययन-अध्यापन किंवा संपर्क साधला जातो. यामध्ये दृश्य अध्ययन शैली यावर भर दिला जातो. यामध्ये मुलाला जास्तीत जास्त दृक स्वरुपात कंटेंट उपलब्ध करून देण्यावर भर असतो. सोबतच  मुलाच्या स्वतः विकसित केलेल्या खुणा , लीपरीडिंग , ओष्ठवाचन , चेहऱ्यावरील हावभाव , करपल्लवी , वाचा या मुलाच्या स्थितीनुरूप संपूर्ण संपर्क पद्धती वापरली जाते. त्यायोगे मुल सर्वसामान्य शाळेत समवयस्क मुलांसोबत शाळेतील कृती मध्ये सहभाग घेऊन आनंदाने शिकते. 

वर्गामध्ये कर्णबधीर मुलांना समोरच्या बाकावर बसविले जाते. सोबतच वर्गशिक्षकांना मुलांच्या समस्याविषयी व अध्ययन-अध्यापन तंत्र पद्धती , अभ्यासक्रम सुलभीकरण समावेशित वर्ग याबाबत चे प्रशिक्षण तसेच विशेष शिक्षक व विशेष तज्ञ यांचा सपोर्ट मिळतो. या सर्वांगाने मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी समावेशित वर्गात कर्णबधीर मुल शिकू शकेल अशी रचना करण्यात आली आहे. व कर्णबधीर मुले आनंदाने शिकत आहे. मूल्यमापन परीक्षा पद्धती मध्ये महाराष्ट्र शासन शासन निर्णय १६ ऑक्टोबर २०१८ नुसार परीक्षा पद्धती सवलती दिल्या जातात.

सारांश

कर्णबधीर मुलांचे अदृश्य दिव्यांग्त्व जरी दिसत नसले मात्र यासाठी लवकरात लवकर निदान व उपचार करून योग्य वेळी शालेय प्रवेश घेऊन शिक्षण सुरु ठेवणे आवश्यक आहे. सोबतच आवश्यकतेनुसार श्रवणप्रशिक्षण आणि स्पीच थेरेपी देखील सुरु ठेवून मुलांच्या वाचा व भाषा विकास होण्यास मदत होईल. कर्णबधीर मुलांच्या सोबत संपर्क साधण्यासाठी संपूर्ण संपर्क पद्धती द्वारे अधिक सराव घेऊन संभाषण कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. समावेशित शिक्षणामध्ये मुलांना शाळेतील कृतीमध्ये सहभागाची संधी उपलब्ध करून दिल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढेल व मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास याची मदत होईल. 


Previous Post Next Post