7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू; सविस्तर वाचा..

7th Pay Commission : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट, सरकारने नुकतेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, आता राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमी पाहूया..

सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू

7th pay commission

राज्यातील सरकारी (State Government Employees) कर्मचाऱ्यांना यापूर्वीच सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे. दिनांक 3 मार्च 2023 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील खाजगी शाळा मधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग  सन 2016 पासून (7th Pay Commission) लागू करण्यात आलेला आहे.

आता राज्यातील महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळातील नियमीत सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या धर्तीवर दि.1 जुलै 2021 पासून 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास शासनाने दिनांक 7 जुलै 2023 रोजी मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळात नियमित सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना दि. 1 जुलै 2021 पासून सुधारित वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करण्यात येणार आहे. तसेच सदर कालावधीची थकबाकी एक रकमी किंवा टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी


7th pay commission

शासन निर्णय पहा

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन पहा
1 जुलै नुसार वेतनश्रेणी न्यूज पहा
महागाई भत्ता वाढ या महिन्यात मिळणार पहा

सरकारी नोकरीच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post