Compassionate Recruitment : अनुकंपा भरती प्रक्रियेतील उमेदवारांना त्वरीत नियुक्ती देण्याचे निर्देश; रिक्त असणाऱ्या 20 टक्के पदांवर नियुक्ती मिळणार

Compassionate Recruitment News : सरकारी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत असताना निधन झाल्यांनतर त्यांच्या कुटुंबांसाठी सरकारी सेवेत रिक्त पदावर अनुकंपा भरती प्रक्रिया राबविण्यात येते, ही प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावून रिक्त असणाऱ्या 20 टक्के पदांवर नियुक्ती द्यावी, असे निर्देश मा. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

$ads={1}

अनुकंपा भरती प्रक्रियेतील उमेदवारांना त्वरीत नियुक्ती देण्याचे निर्देश

Compassionate Recruitment

शासकीय सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून शासकीय कार्यालयातील रिक्त पदांवर अनुकंपा (Compassionate) तत्वावर नियुक्ती देण्यात येते. 

पुणे विभागातील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रकरणे कालबध्द पध्दतीने व जलद गतीने पूर्ण होण्यासाठीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधून सध्या अस्तित्वात असलेल्या प्रतीक्षा यादीनुसार गट क व ड (Group C & D) संवर्गातील रिक्त पदांवर भरती प्रक्रिया तातडीने राबवावी.

प्रत्येक वर्षी त्या-त्या संवर्गातील रिक्त पदांपैकी 20 टक्के पदांवर उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती द्यावी, तांत्रिक पदावर नियुक्तीसाठी तांत्रिक अर्हता धारण करणाऱ्या उमेवारांना प्राधान्याने नियुक्ती द्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शासन स्तरावर जलदगतीने अनुकंपा नियुक्तीसंदर्भात नियमित आढावा घेण्यात येत असल्याने विभागातील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना शंभर टक्के नियुक्ती देण्यात यावी अशी सूचना श्री.राव यांनी यावेळी केली. [जुनी पेन्शन योजना लेटेस्ट बातमी पहा]

अनुकंपा (Compassionate) नियुक्तीचे शासनाचे हे प्रयोजन लक्षात घेता अशाप्रकरणी नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक दृष्टीकोन ठेवून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावावीत. जिल्हा प्रशासनानेसुध्दा कालबध्द वेळापत्रकाद्वारे विभागातील अनुकंपा भरती प्रक्रिया राबवून प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना त्वरीत नियुक्ती द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले. विभागीय आयुक्तालयातून पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून अनुकंपा भरती प्रक्रियेचा आढावा घेताना ते बोलत होते. [सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी येथे पहा]

$ads={2}

Previous Post Next Post