Anandacha Shida : गुढीपाडव्यापासून मिळणार 'आनंदाचा शिधा' - राज्यातील १ कोटी ६३ लाख कुटुंबाना मिळणार शिधा

Anandacha Shida : राज्य सरकारने गोरगरिबांचा सण गोड व्हावा, म्हणून प्रत्येक कुटुंबास १ किलो प्रमाणे रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर पामतेल हे आनंदाचा शिधा किट १०० रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा Anandacha Shida मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर गुढीपाडवा सण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. याचा लाभ राज्यातील १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होणार आहे. (Anandacha Shidha Latest News)

आनंदाचा शिधा : राज्यातील १ कोटी ६३ लाख कुटुंबाना मिळणार शिधा 

Anandacha Shidha Latest News
Anandacha Shidha Latest News

आनंदाचा शिधा कोणाला मिळेल?

राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक त्याचबरोबर औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (APL) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत देण्यात येणार आहे.

आनंदाचा शिधा मध्ये काय मिळणार?

गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रत्येक लाभार्थ्यास १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या स्वरुपात  'आनंदाचा शिधा' गुढीपाडवा या मराठी नविन वर्षापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीत E-Pass प्रणालीद्वारे प्रतिसंच १०० रु. सवलतीच्या दराने वाटप करण्यात येत आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संपूर्ण माहिती

गुढीपाडव्यापासून मिळणार - आनंदाचा शिधा

गुढीपाडवा सणाच्या दिवशीपासून आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी सर्व ठिकाणी आयोजित करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.

आनंदाचा शिधा कोठे व कसा मिळेल?

गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रत्येक लाभार्थ्यास, आनंदाचा शिधा किट E-Pass मशिनद्वारे रेशन दुकानदारांवर प्रतिसंच १०० रु. सवलतीच्या दराने उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्या

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post