कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 'या' राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 37% वाढ; सेवेत नियमित करण्यासाठी 5 वर्षाची अट रद्द होणार?

Contract Employees Salary Increase : कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात, शासकीय सेवेत नियमित करावेत, यासाठी संपूर्ण देशभरातील विविध राज्यात असणाऱ्या कंत्राटी कर्मचारी, कामगारांकडून विविध मागण्यासाठी आंदोलन, मोर्चे निघत आहे. त्यात नुकतेच मध्यप्रदेश राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले असून, बहुतांश लाभ या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत, नुकतेच आंध्र प्रदेश राज्यातील सरकारने कर्माचाऱ्यांच्या पगारात तब्बल 37 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत दि. 2 जून 2014 पर्यंत पाच वर्षे पूर्ण असण्याची अट देखील रद्द केली जाणार आहे. सविस्तर वाचा..

$ads={1}

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 37 टक्के वाढ

Contract Employees Salary Increase

वीज विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारण्याचे ठरवले होते, यासंदर्भात विविध मागण्या करण्यात आल्या होत्या, यामध्ये सरकार सोबत झालेल्या चर्चेनंतर राज्यातील जवळपास 27 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 37 टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे.

आंध्र प्रदेश सरकारने (दि.16 ऑगस्ट) वीज विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेमुळे 27000 हून अधिक कामगारांना फायदा झाला आहे. याबाबत राज्य सरकारचे मा. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले की, कर्मचाऱ्यांना 37 टक्के पगारवाढ आणि विम्याचा लाभ देण्यात आला आहे.

पाच वर्षांचा नियमितीकरण नियम शिथिल होणार

आंध्र प्रदेश सरकारने दिनांक 7 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत दि. 2 जून 2014 पर्यंत पाच वर्षे पूर्ण केलेल्यांच्या सेवा नियमित करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र आता ही पाच वर्षाची अट रद्द होणार आहे. याबाबतचे आदेश लवकरच निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

AP JAC अमरावतीने संयुक्त कर्मचारी परिषदेच्या दिनांक 13 जुलै रोजी झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिवांना निवेदन सादर केले होते, ज्यामध्ये सरकारला 5 वर्षांची सेवा अट शिथिल करण्याची आणि 2 जून 2014 पर्यंत नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची विनंती करण्यात आली होती.

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी अपडेट येथे पहा सरकारी कर्मचारी न्यूज वाचा नोकर भरतीच्या जाहिराती येथे पहा

बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात, AP (Government Employees) सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष यांनी जास्तीत जास्त संख्येने कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे वचन पाळल्याबद्दल सरकारचे आभार मानले.

Previous Post Next Post