Pradhan Mantri Mudra Business Loan : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्र ठरले देशातील सहावे राज्य; महाराष्ट्रात तब्बल 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणांना मंजुरी

Pradhan Mantri Mudra Business Loan : प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2022 पासून ते  मार्च 2023 अखेरपर्यंत 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत. या योजनेतंर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले आहे. या योजनेसाठी किती कर्ज मिळते? आणि अर्ज कोठे करावा? सविस्तर पाहूया..

$ads={1}

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा उद्देश?

Pradhan Mantri Mudra Business Loan

नवीन किंवा सध्या सुरू असलेल्या सूक्ष्म उद्योग/व्यवसायाला 10 लाख रुपयांपर्यंतचे संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे (PMMY) उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे किती कर्ज मिळते?

देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासासाठी केंद्र सरकारने एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर व तरुण या तीन कर्ज प्रकारात 50 हजार ते  10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. देशात आर्थिक वर्ष  2022-23 मध्ये 6 कोटी 23 लाख 10 हजार 598 कर्ज प्रकरणांना मंजुरी दिली असून, त्यापैकी महाराष्ट्राची 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत.

शेड्यूल्ड कमर्शियल बँका (SCB), बँकेतर वित्तीय कंपन्या Non-Banking Financial Companies (NBPC)आणि लघु वित्तीय संस्था (MFI) या सभासद कर्ज देणाऱ्या संस्था (MLI) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय (विनातारण) देतात. 

कर्ज घेण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जिच्याकडे लघु उद्योगासाठी व्यवसाय योजना आहे. ती व्यक्ती या योजनेंतर्गत उत्पादन, व्यापार, सेवा क्षेत्रातील उत्पन्न वाढवणाऱ्या व्यवहारांसाठी कर्ज घेऊ शकते. तसेच शेतीशी संबंधित कामांसाठी तीन कर्ज श्रेणींमध्ये कर्ज उपलब्ध होते. 

  1. शिशू 50,000 रूपयांपर्यंतचे कर्ज
  2. किशोर 50,000 रूपयांपेक्षा जास्त आणि 5 लाखांपर्यंत कर्ज 
  3.  तरुण 5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंत कर्ज

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणांना मंजुरी

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महाराष्ट्र राज्यात 41,58,052 मंजूर कर्ज खात्यांची संख्या होती. आर्थिक वर्ष  2022-23 मध्ये ह्या कर्ज खाते धारकांची संख्या 52 लाख 53 हजार  324 आहे. महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

दिव्यांगांसाठी (अपंग) कर्ज योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज कोठे करावा?

मुद्रा योजना Mudra Yojana (PMMY) च्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज Application सादर करावे लागते. जर तुम्ही स्वत:चा उद्योग सुरू करणार असाल तर, तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

बँकेचे शाखा व्यवस्थापक - Branch Manager तुमच्याकडून उद्योगासंबंधी माहिती घेऊन, त्यानुसार तुम्हाला Mudra Yojana (PMMY) योजनेच्या माध्यमातून Loan मंजूर करतात. Mudra Yojana (PMMY) विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता.

$ads={2}

सर्व जिल्हा परिषदेतील 19,460 पदांची मेगाभरती सुरु - अशी असेल संपूर्ण प्रक्रिया

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post