Best Sip To Invest : म्युचल फंड की फिक्सड डिपॉझिट? कुठे मिळतो जास्त परतावा? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या;

Best Sip To Invest Mutual Fund Vs Fixed Deposit : जे नागरिक गुंतवणूक करतात त्यांचा एकच महत्त्वाचा हेतू असतो तो म्हणजे, त्यांनी गुंतवलेल्या पैशांवर शून्य धोका असावा तसेच जास्तीत जास्त परतावा मिळावा. हे महत्त्वाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणूकदार (Investor) नागरिक गुंतवणुकीसाठी विविध पर्याय शोधतात. अशातच आज आपण आजच्या लेखांमध्ये गुंतवणुकीच्या दोन प्रचलित अशा पर्यायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जे पर्याय सध्या खूपच लोकप्रिय असून, कित्येक नागरिक या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. आम्ही ज्या पर्यायांबद्दल बोलत आहोत तो म्हणजे मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) आणि दुसरा पर्याय म्हणजे म्युचल फंड (Mutual Fund). या दोन्ही गुंतवणुकीच्या पर्यायांमधून नागरिक Invest करून उत्तम व्याज (Interest) प्राप्त करत आहेत. यामधील एक पर्याय तुमच्या गुंतवणुकीचे रूपांतर कोटींमध्ये करत आहे. तर दुसरा पर्याय काही लाखांमध्ये रूपांतर करत आहे.

म्युचल फंड की फिक्सड डिपॉझिट? कुठे मिळतो जास्त परतावा? गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या;

Best Sip To Invest Mutual Fund Vs Fixed Deposit

FD मध्ये गुंतवणूक करणे हे फार सुरक्षित आहे. परंतु एफडी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर यामधून जो परतावा मिळतो तो म्युच्युअल फंड पेक्षा खूपच कमी असतो. दुसरीकडे म्युच्युअल फंड हा पर्याय आहे ज्या माध्यमातून जोखीम कमी जास्त असते परंतु दीर्घकाळ गुंतवणूक केली तर नक्कीच तुमचे पैसे कित्येक पटींनी वाढतात (Fixed Deposit Or Mutual Fund Which Is Better). हा चक्रवाढ व्याज दराचा चमत्कार असल्यामुळे जे एका वर्षामध्ये म्युचल फंड वर व्याज मिळणार असते ते पुढील वर्षांमध्ये व्याज मिळते.

एखाद्या गुंतवणूकदार व्यक्तीने जास्तीत जास्त दहा वर्षाच्या कालावधी करिता दहा लाख रुपयांची एफडी केली असेल. तर सध्या दहा वर्षाच्या एफडीवर सहा ते सात टक्के इतके व्याज मिळत आहे. हा व्याजदर बघितला तर बहुतांश पणे खाजगी तसेच सहकारी बँकांचा असून या व्याजाचा हिशोब केला तर 9 लाख 82 हजार रुपये दहा वर्षांमध्ये तुम्हाला सहा ते सात टक्के व्याजदराने मिळणार आहेत (FD Vs Mutual Fund Calculator). म्हणजे तुमचे पैसे जवळपास दुप्पट होणार आहेत. दहा वर्षाचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून एकूण 19 लाख 82 हजार रुपये मिळतील.

आता म्युच्युअल फंड बद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही म्युचल फंड (Mutual Funds) मध्ये दहा लाख रुपयांचे गुंतवणूक केली तर एक रकमी रक्कम दीर्घ कालावधी करिता दहा वर्षापर्यंत ठेवली. तर प्रत्येक वर्षाला सरासरी 12 टक्के व्याज आपल्याला मिळू शकते. या परताव्याच्या माध्यमातून दहा वर्षांमध्ये आपल्याला 31 लाख रुपये मिळतील. अशाप्रकारे तुम्हाला व्याजदर म्हणून 21 लाख रुपये मिळणार आहेत. आणि या माध्यमातून तुमचे पैसे तिप्पट होतील.

FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा! कोणती बँक देते सर्वाधिक व्याज पहा

दोन्ही गुंतवणुकीच्या (Investments) या साध्या गणना पाहिल्यानंतर तुम्हाला याचा स्पष्टपणे फरक दिसला असेल. एफडी मध्ये गुंतवणूक करत असताना तुमचे पैसे फक्त दहा वर्षांमध्ये दुप्पट होतात. तर अशावेळी म्युचल फंड त्याच कालावधीमध्ये तुमचे जे काही पैसे असतील ते तिप्पट करून देतो. हे स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दिसले आहे. तुम्हाला जवळपास दहा लाख रुपये या ठिकाणी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अधिक परतावा मिळत आहे (FD Vs Mutual Fund For Long Term). जितकी तुमची गुंतवणूक असेल त्या पद्धतीने तुम्हाला परतावा मिळत राहतो. अशावेळी जास्तीत जास्त पैसे गुंतवल्यानंतर तुमचा जो काही परतावा असेल तो करोड पर्यंत पोहोचू शकतो.

कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायचीय? चांगले व्याज देणारी 'ही' SBI ची लोकप्रिय FD योजना 

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Disclaimer

या लेखाच्या मजकुरात कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक सल्ला दिलेला नाही. मात्र आपणास आर्थिक घडामोडींशी संबंधित शैक्षणिक मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आर्थिक किंवा व्यवसायिक विषयांशी संबंधित सल्ला हवा असल्यास आपण नोंदणीकृत वित्त सल्लागाराची मदत घ्यावी. धन्यवाद!

Previous Post Next Post