Gharkul Yojana 2023 : दिव्यांगांसाठी घरकुल योजना; सविस्तर तपशील जाणून घ्या..

Gharkul Yojana 2023 : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून स्वीय निधीमधून विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मागासवर्गीयांकरिता राखीव 20 टक्के स्वीय निधीतून घरकुल योजना, दिव्यांगासाठी राखीव 5% निधीतून दिव्यांग घरकुल योजना, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दिव्यांग कल्याण  निधीतून स्वयंचलित तीन चाकी सायकल  योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया या योजनांविषयी..

$ads={1}

जिल्हा परिषद सांगलीकडून स्वीय निधीमधून सन 2023-24  मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे 

दिव्यांग घरकुल योजना 2023-24

gharkul yojana 2023


ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

लाभार्थी पात्रता निकष

 • अर्जदाराचे  दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के असावे. 
 • अर्जदाराच्या  कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न 1 लाख रूपये च्या आत असावे. (कुटुंब :एकाच शिधापत्रिकेवरील नमूद लोकांचा गट ). 
 • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 
 • अर्जदाराने  या किंवा शासनाकडील अन्य घरकुल योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. 
 • अर्जदाराच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावी. 
 • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ घेता येईल. 
 • अर्जराच्या नावे असणाऱ्या जागेचा 8 अ उतारा असेसमेंट लिस्ट नुसार- किमान क्षेत्रफळ 269 चौ.फूट असावे.
 • पालकांच्या नावे जागा असेल तर संबंधितांचे संमतीपत्र आवश्यक. 
 • गावात अर्जदाराचे किंवा त्याच्या कुटुंबियांच्या नावे कोणतेही पक्के घर नसावे.

अर्जदाराने पंचायत समिती स्तरावर विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील. पंचायत सिमती स्तरावरून प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांच्या यादीमधून लाभार्थी निवड सोडत (लकी ड्रॉ) पद्धतीने करण्यात येईल. प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये रक्कम देय आहे.

मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल दिव्यांग व्यक्तींना मोफत मिळणार, लगेच करा अर्ज

स्वयंचलित तीन चाकी सायकल  योजना 2023-24

ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना  स्वयंचलित तीन चाकी सायकल घेणेसाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत प्रति लाभार्थी 42 हजार रूपये प्रमाणे अनुदान देण्यात येते.

लाभार्थी पात्रता निकष

 • अर्जदार अस्थिव्यंग असावा पण मतिमंद नसावा (किमान 60 टक्के पासून पुढचे दिव्यांगत्व आवश्यक). 
 • अर्जदाराचे वय हे 18 ते 50 या वयोगटातील असणे आवश्यक आहे. 
 • अर्जदाराच्या कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न 1 लाख रूपये च्या आत असावे. 
 • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 
 • अर्जदाराने या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. 
 • अर्जदाराच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावी. 
 • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ घेता येईल.
$ads={2}

अर्जदाराने पंचायत समिती स्तरावर विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील. पंचायत सिमती स्तरावरुन प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांच्या यादीमधून लाभार्थी निवड सोडत (लकी ड्रॉ) पद्धतीने करण्यात येईल. 

अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या वैयक्तिक खातेवर प्रथमत: 50 टक्के व वस्तू खरेदीच्या मूळ पावत्या सादर केले नंतर उर्वरित 50 टक्के रक्कम वर्ग करण्यात येईल. 

अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यावर प्रथमत: 50 टक्के व वस्तू खरेदीच्या मूळ पावत्या सादर केल्यानंतर उर्वरित 50 टक्के रक्कम वर्ग करण्यात येते.

दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मोठे निर्णय
Previous Post Next Post