समावेशित शिक्षण संकल्पना Concept of inclusive education

समावेशित शिक्षण संकल्पना  Concept of inclusive education




group activity inclusive classroom

समावेशित शिक्षण संकल्पना Concept of inclusive education 1960 मध्ये बऱ्याच देशांतून अस्तित्वात आली. 1981 च्या ‘आंतरराष्ट्रीय अपंग वर्षा’पासून या संकल्पनेस चालना मिळून प्रसार झाला. 


1990 मध्ये जागतिक स्तरावरील परिषद थायलंड मधील जोमॅथिअम येथे झाली. या परिषदेत ‘समावेशित शिक्षणाची गरज’ या विषयावर चर्चा होउन ही संकल्पना जागतिक स्तरावर मांडण्यात आली. 


1994 मध्ये भारतासह 92 देश व 25 जागतिक संघटनांनी हा विचार व संकल्पना मान्य केली. समावेशित शिक्षण पदधती उत्तम शिक्षण पदधती मानली जाते. कारण या पदधतीत :-


1) शिक्षण समाजाच्या सर्व घटकांना उपलब्ध होते.
2) शिक्षण सर्व दूर उपलब्ध होते.
3) विदयार्थ्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो.
4) विविध शिक्षण पदधतींचा अवलंब केला जातो.
5) विदयार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व कुवतीनुसार शिक्षणात प्रगती करण्याची संधी मिळते.
6) दर्जेदार व जीवन उपयोगी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.
 तुम्हांला माहिती आहे का?


८६ वा घटना दुरुस्ती कायदा २००२ नुसार,
६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना, 'मोफत व सक्तीचे शिक्षण' हा आता घटनेतील आर्टिकल २१-A नुसार मूलभूत हक्क आहे.


    शिक्षण म्हणजे दया किंवा संधी नाही तर तो
    एक मूलभूत मानवी हक्क आहे; ज्यासाठी
    सर्व मुली व स्त्रिया प्राप्त आहेत.


समावेशित शिक्षण  Inclusive education म्हणजे सर्वांसाठीचे असे शिक्षण, ज्यामधे सर्व विदयार्थी all participant अध्ययन प्रक्रियेत समान सहभागी असतील. 

>> समावेशित शिक्षण - दिव्यांग योजना सुविधा व सवलती (Inclusive Education)

>> समावेशित शिक्षणाची तत्वे


विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना cwsn समावेशित शिक्षणाची सुविधा पुरविणे हे या विश्वासावर आधारित आहे की, सर्वांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संसाधनाचा, उपक्रमांचा व कृतींचा त्यांना लाभ मिळावा व या विशेष मुलांना केवळ विशेष सेवा वर अवलंबून रहावे लागू नये.

 
समावेशकता तेव्हाच राखली जाईल, जेव्हा गटातील सर्व विद्यार्थी उपक्रमात सहभागी होऊ शकतील. म्हणजेच  यात सर्व विद्यार्थ्यांचा All student विचार केला आहे. आणि केवळ काही विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांचाच किंवा फक्त विशेष क्षमता किंवा अक्षमता किंवा गरजा असलेल्यांचा केलेला नाही. तर सर्व विद्यार्थी आपापल्या गरजेनुरूप  वेगवेगळ्या
अध्ययन शैलीने learning style शिकत असतात. जसे दृश्य शैली,श्राव्य ,स्पर्श , कृती , बहुअध्ययन शैलीने शिकत असतात. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या शैलीनिहाय सपोर्ट देवून विद्यार्थी अध्ययन करतील.



inclusive education needs

What is inclusive education? समावेशित शिक्षण म्हणजे काय?


"समावेशित शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे असे शिक्षण जेथे सर्व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत समान सहभाग घेतील.. हा हक्क भारतीय राज्यघटनेने नमूद केला आहे."

सर्व भारतीयांना समान दर्जा व समान संधिचा हक्क मिळाला पाहिजे यास भारतीय घटनेने मान्यता दिली आहे. म्हणून सर्व समाजाची व समूहाची ही जबाबदारी आहे की, सर्वांचा समान सहभाग घेऊन सर्वांना समान वर्तणूक दिली पाहिजे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 असे सांगतो की प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. 

आपल्या शाळांतून व वर्गातून प्रत्येक बालकांच्या या सामाजिक संविधानिक व कायदेशीर हक्काबद्दलचा समावेश शैक्षणिक क्रियांतून व कृतीतून दिसून येणे अपेक्षित आहे. आणि अशा विविध पार्श्वभूमीच्या विविध गरजा व क्षमता असणाऱ्या बालकांचा समावेश करण्यासाठी आता अभूतपूर्व तयारी दाखवणे आवश्यक आहे. जेथे कल्पना, ज्ञान, मूल्ये माहिती यांचे वहन व संक्रमण होते. 

वर्ग व्यवस्थापन आणि मूलभूत घटकांच्या अंतरक्रिया जसे की विद्यार्थी -शिक्षक अभ्यासक्रमातील मुद्दे यामुळे गट 'माहिती नाही' या स्थितीतून 'माहिती आहे' या स्थितीकडे जातो.

समावेशित शाळेतील विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे आव्हाने व उपाययोजना 

 समावेशित शिक्षणाचा प्रवास हा समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाकडे सुरू झालेला आहे.  समग्र शिक्षा अभियान  samagra shiksha abhiyan योजनेअंतर्गत समावेशित शिक्षण योजना अंतर्गत प्राधान्य क्रमाने विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या वर्गशिक्षकांना वर्ग अध्ययन-अध्यापन तंत्र पद्धती विकसन प्रशिक्षण Curriculum Transaction चे प्रशिक्षण प्रोग्राम सुरू आहे.  दरम्यान अध्ययन शैली प्रमाणे वर्गातील विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असतात. 

उदाहरणार्थ- काही विद्यार्थी ऐकून चांगले शिकतात तर काही विद्यार्थी पाहुन चांगले शिकतात. काही विद्यार्थी स्पर्शाने तर काही विद्यार्थी कृतीतून चांगले शिकतात. विद्यार्थी वेगवेगळ्या अध्ययन शैलीचा वापर करून शिकत असतात. अध्ययन शैली वर फोकस करून वर्गातील सर्व विद्यार्थी अध्ययन – अध्यापन प्रक्रियेत समान सहभाग घेऊन अध्ययन करतील.

यासाठी मुलांच्या गरजेनुरूप शैक्षणिक सपोर्ट देवून सर्व विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत. हेच समावेशित शिक्षण संकल्पनेतून समावेशित शिक्षण संकल्पना Concept of inclusive education  यश मिळालेले दिसून येते.





Previous Post Next Post