Syllabus 2021-22 | दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाही शाळा सुरळीतपणे सध्या सुरू झालेल्या नाहीत. शालेय शिक्षण विभागाने जुलै महिन्यामध्ये शालेय अभ्यासक्रम 25% ने कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, १ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत सेतू अभ्यासक्रम राबविण्यात आला आहे.

सन २०२०-२१ पासून इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी च्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विशेष गरजा असणा-या (दिव्यांग ) विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र या विषयाच्या पुनर्रचित पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करण्यात बाबत कळविण्यात आले असून, त्यासंबंधी चालू शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिली ते बारावी इयत्तेचा अभ्यासक्रम/पाठ्यक्रम २५% ने कमी करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र या विषयाचा देखील अभ्यासक्रम २५% ने कमी करण्यात आला आहे.

विशेष गरजा असणा-या (दिव्यांग) विद्यार्थ्यासाठी कार्यशिक्षण, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र या विषयाच्या पुनर्रचित पाठ्यपुस्तकांची निर्मिती बालभारती संस्थेकडून करण्यात आली असून, सदर पाठ्यपुस्तकांच्या PDF प्रती पाठ्यपुस्तक मंडळाच्या www.ebalbharti.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

>> पाठ्यपुस्तकांच्या PDF प्रती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

{getButton} $text={Download} $icon={download} $color={Hex Color}

Syllabus 2021-22 | विशेष गरजा असणा-या (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम 

>> पंजाबी, रशियन आणि कार्याशिक्षण (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी) या विषयांचा २५% ने कमी केलेला पाठ्यक्रम

>> इयत्ता नववी दिव्यांग विद्यार्थी कार्याशिक्षण, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र या विषयांचा २५% ने कमी केलेला पाठ्यक्रम

>> इयत्ता दहावी दिव्यांग विद्यार्थी कार्याशिक्षण, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र या विषयांचा २५ % ने कमी केलेला पाठ्यक्रम

उपरोक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी २५% ने कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (SCERT) अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

{getButton} $text={Syllabus Download} $icon={link} $color={Hex Color}


>>  SCERT स्वाध्याय आठवडा 5 वा

>> राज्यातील कोरोना (covid-19) प्रादुर्भावामुळे 25% ने कमी केलेला अभ्यासक्रम व पाठ्यक्रम शालेय वर्ष 2020-21

Previous Post Next Post