दिव्यांग उमेदवारांकरिता आय टी आय प्रवेश प्रक्रिया आरक्षण व व्यवसायानुरुप पात्रता २०२१

महाराष्ट्र शासन , कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, संबंधित विभागामार्फत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०२१ सत्रासाठी प्रवेश सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. 

दिव्यांग उमेदवारांकरिता आय टी आय प्रवेश प्रक्रिया आरक्षण व्यवसायानुरुप पात्रता

{tocify} $title={Table of Contents}


दिव्यांग उमेदवारांकरिता आय टी आय प्रवेश प्रक्रिया आरक्षण व व्यवसायानुरुप पात्रता 

ऑन लाईन प्रवेश अर्ज मुदत

प्रवेश प्रक्रीया दिनांक 15 जुलै, 2021 दु.02.00 वाजेपासून सुरु झालेली आहे व अंतिम दिनांक  ते  31 ऑगस्ट, 2021 सायं.5.00 वाजेपर्यंत आहे.

>> अधिक माहितीसाठी 

>> आय टी आय प्रवेश २०२१ 

दिव्यांग उमेदवारांकरिता आरक्षण

सक्षम अधिकरणाच्या कक्षेमध्ये सामान्य प्रवेश पध्दती अंतर्गत उपलब्ध जागांकरिता विविध प्रकारच्या आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अपंगत्व असलेल्या उमेदवारांकरिता आरक्षण

The Rights of Persons with Disabilities Act, २०१६ (No. ४९ of २०१६) तरतुदींच्या अनुषंगाने केंद्रीय प्रवेश पध्दती अंतर्गत उपलब्ध जागांच्या ५% जागा प्रत्येक (ITI) औ.प्र.संस्थामध्ये अपंग उमेदवारांना आरक्षित असतील.

खाली दिलेल्या प्रकाराप्रमाणे हे आरक्षण अपंग उमेदवारांना लागू आहे.

 • PWD - 1 Blindness and low vision
 • PWD - 2 Deaf and hard of hearing
 • PWD - 3 Locomotor disability including cerebral palsy, leprosy cured, dwarfism, acid attack victims and muscular dystrophy
 • PWD - 4 autism, intellectual disability, specific learning disability and mental illness
 • PWD - 5 Multiple disabilities from amongst persons under clauses PWD - 1 to PWD - 5

दिव्यांग्त्व असलेल्या उमेदवारांकरिता महत्वाच्या सूचना

 • शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतील व्यवसायांचे प्रशिक्षण हे प्रात्यक्षिकाभिमुख असल्यामुळे अपंग वर्गातील उमेदवारांकरिता व्यवसायानुरुप पात्रता प्रपत्र-१ मध्ये दिलेली आहे.
 • अपंग उमेदवारांना त्यांच्या शारिरीक अपंगत्वाच्या प्रकारानुसार पात्र असलेल्या व तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीप्रमाणे ५% जागा आरक्षित ठेवण्यात येतील. 
 • मूळ जिल्ह्यासाठी असणाऱ्या जागांसाठीच या जागांचे वाटप होईल. प्रत्येक अपंग वर्गवारीला १.०% देणे आवश्यक आहे (सर्वसामान्य अपंगांसाठी राखीव असणाऱ्या जागांसाठी एकच गुणवत्ता यादीनुसार प्रवेश समर्थनीय नाही)
 • अपंग उमेदवाराला शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत व्यवसायाला प्रवेश मिळाल्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रमात कोणतीही सूट/अधिक सुविधा दिल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
 • अपंग उमेदवाराला शैक्षणिक पात्रतेत सूट मिळणार नाही.
 • अपंगाच्या आरक्षणाच्या दाव्यासाठी सादर केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्रात अपंगत्व कायमस्वरुपी असून त्याचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे.
 • अपंगाच्या आरक्षणाकरिता फक्त वैद्यकीय मंडळाकडून दिलेले प्रमाणपत्र विचारात घेतले जाईल.

ITI Admission Portal :

 http://admission.dvet.gov.in

{getButton} $text={ITI Website} $icon={link} $color={Hex Color}

“ITI Admission माहितीपुस्तिका Download करा.

{getButton} $text={ITI माहिती पुस्तिका} $icon={download} $color={Hex Color}


दिव्यांग उमेदवारांकरिता व्यवसायानुरुप पात्रता 


 

> वेळोवेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State) यांच्या Official Website ला भेट द्या. https://admission.dvet.gov.in/

{getButton} $text={ITI Website} $icon={link} $color={Hex Color} 


संदर्भ- Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य माहिती पुस्तिका


>>  समावेशित शिक्षण: दिव्यांग प्रेरणादायी पुस्तके | divyang motivation book


>> SCERT SWADHYAY 2021

Previous Post Next Post