आनंदी जीवन जगण्याचे 7 सूत्र | सकारात्मक विचार कसा करावा? - Power of Positive Thinking in Marathi

Power of Positive Thinking in Marathi जे आत पेरलं जातं, तेच बाह्यजगात बहरू लागत, यासाठी आपल्याला सजग राहून सकारात्मक विचार करावा लागतो. आपल्या आयुष्यात चांगलं आणि वाईट यापैकी आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोष्टी घडायला हव्यात असे वाटते? निश्चितच चांगल्या गोष्टी बरोबर! म्हणजे चांगलं घडण्यासाठी केलेला चांगला विचार म्हणजे सकारात्मक विचार होय. आजच्या आर्टिकल मध्ये आपण सकारात्मक विचार कसा करावा? म्हणजे सुखी , समाधानी आणि आनंदी जीवन जगता येईल हे सर्व आपल्या विचारावर अवलंबून आहे. यासाठी आपल्याला आनंदी जीवन जगण्याचे 7 सूत्र कोणते आहे? त्याची माहिती मिळणार आहे.

आनंदी जीवन जगण्याचे 7 सूत्र | सकारात्मक विचार कसा करावा? - Power of Positive Thinking in Marathi

power of positive thinking in marathi
Power of Positive Thinking in Marathi

सकारात्मक विचार कसा करावा?

सकारात्मक म्हणजे कोणतीही समस्या निर्माण झाल्यानंतर आपल्या मनाला योग्य दिशा देण्यासाठी केलेला सकारात्मक विचार म्हणजे सकारात्मकता होय. यासाठी आपल्याला योग्य विचार करणे गरजेचे असते. आपल्या मनाला जर आपण योग्य विचारांचं खाद्य पुरवलं तर आपल्या आयुष्यात देखील सकारात्मक गोष्टी घडत असतात.

आपल्या भाव, विचार, वाणी आणि क्रियेवरून आपण स्वतःच्या आयुष्यात कोणत्या गोष्टींची निर्मिती करणार आहे, याचा अंदाज येतो. म्हणूनच या चारही गोष्टींना एक दिशा द्यायला हवी. 

मन म्हणजे एक हत्यार (टूल) आहे! या हत्याराचा वापर करून आपण हवं ते निर्माण करू शकतो. म्हणून अंतर्मनाला योग्य संदेश देण्यासाठी बाह्यमनालादेखील प्रशिक्षित करायला हवं. शिवाय, अंतर्मनाचं नव्याने प्रोग्रॅमिंग करायला हवं. कारण आपण स्वतःच आहात, आपल्या जीवनाचे प्रोग्रॅमर!

आजवर आपण इतरांच्या व्यक्तिमत्त्वातील दोष पाहून त्यांना दोषी ठरवत आलोय. पण वास्तविक 'दोष पाहणारी दृष्टीच सदोष आहे.' मला जर हे जग सुंदर वाटत असेल, तर याचा अर्थ मी स्वतः खूप सुंदर आहे. (जशी दृष्टी तशी श्रुष्टी)

सकारात्मक विचार कसा करावा? | आनंदी जीवन जगण्याचे 7 सूत्र

सूत्र १ - विश्वात कोणत्याही गोष्टीची प्रकट निर्मिती होण्यापूर्वी ती स्रोताद्वारे विचारांमध्ये निर्माण झालेली असते. 

तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत आणि भविष्यात तुम्ही काय निर्माण करू इच्छिता? तुम्ही प्रेम, आनंद आणि मौनाने (शांती) युक्त जीवन जगू इच्छिता? तुमच्या आसपास प्रेम, आनंद, (शांती) युक्त जीवन असावं, असं तुम्हाला वाटतं का?
तुम्ही पृथ्वीवर उच्चतम विकसित समाज निर्माण करू इच्छिता, जेणेकरून सर्वांना अंतिम लक्ष्य प्राप्त होऊन संतुष्टी प्राप्त व्हावी आणि सर्वांच्या अंतर्यामी असणारे गुण, कौशल्ये पूर्णत: खुलावीत. हे लक्षात घ्या, की आज तुम्ही जगत असलेलं जीवन म्हणजे तुम्ही भूतकाळात केलेल्या विचारांचाच परिणाम ! 

सूत्र २ - दुसऱ्या विचार सूत्रानुसार, होश आणि जोश यांसह एका दिशेत केलेले विचारच वास्तवात उतरतात. 

जोश म्हणजे उत्साह. हा उत्साहच विश्वासात परिवर्तित होत असतो. आज तुमचा विश्वास कितपत खुललाय? तुमचं जीवन प्रेम, आनंद, शांतीच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचेल, असा विश्वास तुम्हाला वाटतो का? सध्या तुम्ही आत्मसात केलेल्या समजेमुळे हे सहजशक्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?

सूत्र ३ - जे तुम्हाला हवंय, त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा, जे नको आहे त्यावर नाही.

अर्थात 'अमुक नको व्हायला, तमुक नको व्हायला ' यावर ध्यान देण्याऐवजी स्वतःला विचारा, 'मला जीवनाकडून नेमकं काय हवंय?' उदा. 'मला आजारी पडायचं नाही', असं म्हणण्याऐवजी म्हणा, 'मला सदैव निरोगी आणि टवटवीत राहायचंय. '

सूत्र ४ - हे जग जसं दिसतं, तसं नसतं. जग तसंच असतं, जसा तुम्ही विचार करता, जसे तुम्ही आहात. 

प्रत्येकाचं विश्व वेगवेगळं आहे. अर्थात सर्वांची गीता भिन्न आहे. दुर्योधनाची गीता वेगळी होती आणि अर्जुनाची त्याहून वेगळी होती. म्हणूनच या विचार नियमांसोबत स्वतःचा दृष्टिकोन बदला. कारण जे विचारसूत्र आपण वाचत आहात, ते म्हणजे सुखी जीवनाची गुरुकिल्लीच !

सूत्र ५ - सर्व काही भरपूर आहे. समृद्धी हा निसर्गाचा नियम आहे. 

निसर्ग प्रत्येक गोष्ट भरपूर द्यायला तयार असतो. तेव्हा यावर मनन करा, की तुमच्या जीवनात काय भरपूर आहे आणि कोणत्या गोष्टींची कमतरताआहे? तुम्हाला ज्या गोष्टींची कमतरता जाणवतेय, त्याबाबत तुमच्या मनात कोणतातरी मूळ विचार (कोअर थॉट) घर करून बसलाय. अशा कोअर थॉट्सना विलीन करून समृद्धीचा अनुभव घ्या.

सूत्र ६ - एखाद्या माणसावर इतरांच्या विचाराचा परिणाम तोपर्यंत होत नाही, जोपर्यंत तो होऊ देत नाही. 

यासाठीच नेहमी असा विचार करा, 'माझ्यावर केवळ सकारात्मक गोष्टींचा, माझा विकास आणि तेजविकास घडवणाऱ्या बाबींचाच परिणाम होवो. मी केवळ सकारात्मक गोष्टींप्रति ग्रहणशील (receptive) असावं. मी ईश्वराची संपत्ती आहे. कोणतीही वाईट शक्ती मला स्पर्श करू शकत नाही (I am God's property, No evil can touch me). ' तुम्हाला लोकांच्या विचारांबाबत जर भीती वाटत असेल, तर स्वतःला वारंवार सांगा, 'जोपर्यंत मी परवानगी देत नाही, तोपर्यंत माझ्यावर इतरांच्या नकारात्मक विचार वा करणीचा अजिबात परिणाम होऊ शकत नाही. माझ्यावर केवळ सकारात्मक गोष्टींचा परिणाम होतो. '

सूत्र ७ - आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीला प्रकट करण्यासाठी स्वतःच्या भाव, विचार, वाणी आणि क्रियेत एकरूपता असायला हवी. 

यासाठीच तुम्ही जे बोलता त्याचाच विचार करता का ? सर्व गोष्टींमध्ये एकरूपता आहे का? तुम्ही जे बोलता, ते करत नसाल आणि ज्याबद्दल विचार करताय, तसे तुमचे भाव नसतील, तर तुमचं जीवन खंडित (अपूर्ण) आहे. यासाठीच भाव, विचार, वाणी आणि क्रियेत ताळमेळ साधून अखंड जीवन जगा. 

दोन्ही हात खोलून निसर्गाला संकेत द्या,  'मी प्रेम, आनंद आणि शांतीपूर्ण जीवन जगण्यासाठी तयार आहे.' आता हळूहळू हात खाली घेत म्हणा, 'प्रेम, आनंद, मौन... प्रेम, आनंद, मौन... प्रेम, आनंद, मौन... प्रेम, आनंद, मौन...'

मनातल्या मनात 'प्रेम, आनंद, मौन...'चा जप सुरू ठेवा आणि हे करताना प्रेम आणि विश्वास असू द्या. या ध्यानविधीद्वारे तुम्ही निसर्गाला संदेश देताय, 'मी माझ्या जीवनात पूर्णपणे खुलायला, बहरायला तयार आहे.'

अशा प्रकारे तुम्ही सुखी, समाधानी व आनंदी जीवनासाठी वर सांगितलेले ७ सूत्र यांचा सकारात्मक विचार करण्यासाठी याची आपल्याला मदत मिळेल. व काही दिवस हे आपण प्रत्यक्ष अनुभवल्या नंतर आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडताना आपल्याला दिसतील. 
 हे सुद्धा वाचा

महत्वाच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post