Cabinet Decision : राज्य सरकारचा लाखो कामगारांना दिलासा, नवीन कामगार नियमांना मान्यता

Cabinet Decision Approval Of New Labor Regulations : राज्यातील लाखो कामगारांसाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय दिनांक ३० मे २०२३ रोजीच्या कॅबीनेट बैठकीत निर्णय घेतला आहे, या निर्णयाचा राज्यातील लाखो कामगारांना लाभ मिळणार आहे, राज्यात नवीन कामगार नियम लागू होणार असून, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य  आणि कामाची स्थिती संहितेस मान्यता दिली आहे, नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्याने लाखो कामगारांचे हित जपण्यात आले आहे, काय आहे निर्णय सविस्तर पाहूया..

राज्य सरकारचा लाखो कामगारांना दिलासा, नवीन कामगार नियमांना मान्यता

Cabinet Decision Approval Of New Labor Regulations

केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून, दिनांक ३० मे रोजीच्या कॅबिनेट बैठकीत शासनाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य  आणि कामाची स्थिती संहिता (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील लाखो कामगारांना लाभ मिळणार आहे.

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य  आणि कामाची स्थिती संहितेस मान्यता

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य  आणि कामाची स्थिती संहितेस मान्यता देण्यात आली आहे. यातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे  

  • 100 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांमध्ये उपहारगृह बंधनकारक
  • 250 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात कल्याण अधिकारी 
  • 50 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात पाळणा घर अशा काही तरतुदी असतील.

यापूर्वी वेतन संहिता (Code on Wages), 2019, औद्योगिक संबंध संहिता (Code on Industrial Relations), 2020, सामाजिक सुरक्षा संहिता (Code on Social Security) 2020 या 3 संहितांच्या नियमांना राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात लेटेस्ट शासन निर्णय येथे पहा
जुनी पेन्शन योजना संदर्भात लेटेस्ट अपडेट येथे पहा
'आरटीई' 25 टक्के प्रवेश संदर्भात लेटेस्ट अपडेट येथे पहा

केंद्र शासनाने 1999 मध्ये माजी केंद्रीय कामगार मंत्री रविंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा श्रम आयोग नेमला होता. या आयोगाने सर्व 29 कामगार कायदे एकत्रित करुन या 4 कामगार संहिता (Labour Codes) तयार करण्याची शिफारस केली होती. या 4 संहिता अधिनियम संसदेने पारित केले आहेत. [मागील बैठकीतील चार महत्वपूर्ण निर्णय येथे पहा]

कामगार हा विषय समवर्ती सूची मध्ये समाविष्ट असल्याने केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकत्रित संहिता तयार केली आहे. सर्व संहितांची अंमलबजावणी सर्व राज्यांमध्ये एकत्रितरित्या करावयाची असल्याने राज्यांनी संबंधित संहितांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियम पारित करणे आवश्यक आहे. त्यानुसार केंद्र शासनाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य  आणि  कामाची स्थिती संहिता अधिनियम, 2020 प्रसिद्ध केले आहेत.

या अधिनियमात राज्यांना समुचित शासन व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती (कामगार) संहिता नियम तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार या संहितेस मान्यता देण्यात आली आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्याने लाखो कामगारांचे हित जपण्यात आले आहे. [सरकारी कर्मचारी लेटेस्ट अपडेट येथे पहा]

सरकारी कर्मचाऱ्यांचे महत्वाचे अपडेट येथे पहा
अबब! महागाई भत्यात तब्बल 8% टक्क्यांची वाढ येथे पहा

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post