National Education Policy : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशी नुसार राज्यात 'नवभारत साक्षरते'ला प्रारंभ, ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन..

NEP - Navbharat Literacy Programme 2023 : राज्यामध्ये आजच्या स्थितीनुसार जवळपास १८ कोटी नागरिक निरक्षर असून त्यांना साक्षर करण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिफारस केल्याप्रमाणे नवभारत साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तसेच संयुक्त राष्ट्र शाश्वत विकासच्या ध्येयानुसार सन 2030 पर्यंत देशातील सर्व तरुण आणि प्रौढ पुरुष व स्रिया अशा सर्वांना १०० टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करणे हा या योजनेमुळे उद्देश आहे. सविस्तर पाहूया..

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशी नुसार राज्यात 'नवभारत साक्षरते'ला प्रारंभ

Navbharat Literacy Programme

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP 2020) ची अंमलबजावणी राज्यात नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार आहे. याचाच एक भाग म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रमाला प्रारंभ होत असून, त्यापूर्वी या कार्यक्रमासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅपचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिनांक २ जून २०२३ रोजी आयोजित केले आहे. [नव्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू येथे पहा]

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये प्रौढ व निरंतर शिक्षण या संबंधी उल्लेख आहे. त्यातील परिच्छेद क्र.२१.४ मध्ये नमूद करण्यात आले आहे की, विशेषतः प्रौढ शिक्षणासाठी भक्कम आणि नाविन्यपूर्ण शासकीय उपक्रमाद्वारे तसेच, समुदाय सहभाग आणि तंत्रज्ञानाचे सहज आणि फायदेशीर एकत्रीकरण केले जाईल, ज्यामुळे १०० टक्के साक्षरतेचे उदिष्ट लवकरात लवकर साध्य करणे शक्य होईल. 

[नवीन शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश योजना' येथे पहा]

त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने आणि २०२१ च्या अर्थसंकल्पीय घोषणेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार प्रौढ शिक्षणाची एक नवीन योजना नवभारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. 

सदर योजनेचा कालावधी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ असा आहे. सदर योजना केंद्र व राज्यशासन यामधील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात लागू करण्यात आलेली आहे.

[नवीन शैक्षणिक धोरणातील संरचना वयोगट येथे पहा]

ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन

ऑनलाईन सर्वेक्षणासाठी मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे सदर मोबाइल अॅपचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्हद्वारे दि. २ जून २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. 

हे प्रशिक्षण नवभारत साक्षरता योजनेचे काम पाहणारे अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय स्तरावरील सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा, शालेय मुख्याध्यापक व शिक्षक यांना ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्ह द्वारे देण्यात येत आहे.

नवभारत साक्षरता प्रशिक्षण Youtube Live लिंक पुढीलप्रमाणे -  https://youtube.com/live/F4mVaLbOFjk?feature=share

सदर कार्यक्रम युट्युब वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक कर्ज घ्या, व्याजाचा परतावा शासन करेल
'आरटीई' २५ टक्के प्रवेश लेटेस्ट अपडेट येथे पहा
लेटेस्ट कॅबिनेट निर्णय येथे पहा 


Previous Post Next Post