Bakri Eid Holiday 2023 : बकरी ईद सणाची बुधवारची सुट्टी रद्द; शासनाकडून सुधारित अधिसूचना जारी..

Bakri Eid Holiday 2023 : बकरी ईद सणाच्या निमित्ताने मिळालेली दिनांक 28 जून 2023 रोजीची सुट्टी आता रद्द करण्यात आली असून, त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना शासनाने जाहीर केली असून, आता बुधवार ऐवजी दिनांक 29 जून 2023 गुरुवार रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बकरी ईद सणाची बुधवारची सुट्टी रद्द

Bakri Eid Holiday 2023

वर्षभरातील सार्वजनिक सुट्ट्या निमित्त शासनाकडून सन 2023 मधील सुट्ट्या संदर्भात जाहीर केलेल्या अधिसूचनांमध्ये बकरी ईद सणानिमित्त 28 जून रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला असून, ही सुट्टी दिनांक 29 जून 2023 गुरुवार रोजी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव यांनी काढली आहे.

सुधारित अधिसूचना जारी

शासनाने सन २०२३ करीता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्टयांमधील बकरी ईद ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.28 जून 2023 रोजी दर्शविण्यात आली होती. सदर सण गुरुवार, दि.29 जून 2023 रोजी येत असल्याने दि.28 जून 2023 रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, दि.29 जून 2023 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Bakri Eid Holiday 2023


Previous Post Next Post