RTE Admission : RTE 25% प्रवेशासाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ; प्रतीक्षा यादीतील 10325 प्रवेश निश्चित

RTE Admission Date 2023 : राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023 24 अंतर्गत सध्या प्रतीक्षा यादीतील 25 हजार 890 मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे, सध्या या मुलांच्या प्रवेश निश्चितीसाठी कागदपत्रे पडताळणी सुरु असून, त्यांना 12 जून पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता प्रतिक्षा यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रतीक्षा यादीतील 10325 प्रवेश निश्चित

RTE Admission Date 2023

राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा जानेवारी महिन्यामध्येच सुरू करण्यात आली असून, 5 एप्रिल 2023 रोजी आरटीई ऑनलाइन सोडत (लॉटरी) जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार 94 हजार 700 मुलांची दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी लॉटरीमध्ये निवड करण्यात आली होती, आणि 81 हजार 129 मुलांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली, त्यानुसार कागदपत्रे पडताळणी करून 64 हजार 243 मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.

त्यानंतर प्रतीक्षा यादीतील 81 हजार 129 विद्यार्थ्यांपैकी रिक्त जागा नुसार प्राधान्य क्रमाने 25 हजार 890 मुलांना आता प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत RTE पोर्टल वरील आकडेवारीनुसार 10 हजार 325 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

RTE 25% प्रवेशासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र. 1 मधील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशासाठी आता दिनांक 19 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

RTE Admission

प्रतिक्षा यादीतील टप्पा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश निश्चित करण्याकरिता दि.30 मे 2023 ते दि. 12 जून 2023 या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आली होती. सदर प्रतिक्षा यादी टप्पा क्र. 1 मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस दिनांक 19 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सरकारी कर्मचारी पेन्शन संदर्भात लेटेस्ट अपडेट पहा

'आरटीई' प्रतीक्षा यादीतील अर्जाची स्थिती येथे पहा
जिल्हानिहाय रिक्त जागा पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.


Previous Post Next Post