RTE Admission Status 2023 : महाराष्ट्र राज्यातील आरटीई 25 टक्के योजनेअंतर्गत आर्थिक व वंचित घटकातील बालकांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो, यंदाची RTE प्रवेश प्रक्रिया 2023 24 अंतिम टप्प्यात असून, प्रवेशाची दुसरी फेरी अर्थात प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश निश्चित करण्याची उद्या (दि. 12) शेवटची तारीख आहे.
'आरटीई' प्रवेशासाठी उद्या शेवटचा दिवस
'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 अंतर्गत सध्या राज्यांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याचे काम सुरू आहे, RTE लॉटरी मध्ये निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील 25 हजार 890 मुलांना प्रवेश घेण्याची संधी मिळाली असून, दिनांक 30 मे पासून सुरु असलेल्या या फेरीची अंतिम मुदत 12 जून 2023 पर्यंत देण्यात आली आहे.
प्रतीक्षा यादीतील आतापर्यंत 8449 प्रवेश निश्चित
राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा जानेवारी महिन्यामध्येच सुरू करण्यात आली असून, 5 एप्रिल 2023 रोजी आरटीई ऑनलाइन सोडत (लॉटरी) जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार राज्यातील 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते.
त्यानुसार 94 हजार 700 मुलांची दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी लॉटरीमध्ये निवड करण्यात आली होती, आणि 81 हजार 129 मुलांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली, त्यानुसार कागदपत्रे पडताळणी करून 64 हजार 243 मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.
त्यानंतर प्रतीक्षा यादीतील 81 हजार 129 विद्यार्थ्यांपैकी रिक्त जागा नुसार प्राधान्य क्रमाने 25 हजार 890 मुलांना आता प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत RTE पोर्टल वरील आकडेवारीनुसार 8 हजार 449 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
राज्यात 17 हजारहून अधिक जागा रिक्त
दिनांक 11 जून 2023 रोजीच्या RTE पोर्टल वरील आकडेवारीनुसार आतापर्यंत 8 हजार 449 मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, 17 हजार 441 जागा अजून रिक्त असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अजून किती प्रवेश निश्चित होतात हे पहावे लागेल. जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज पहा