कंत्राटी तत्वावरील सफाई कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार, सोबतच PF, HRA, ESIC Bonus..

Contractual Cleaning Workers News : कंत्राटी तत्वावरील सफाई कामगारांचे विविध प्रश्न व अडचणींबाबत पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, यावर सरकारने कंत्राटी तत्वावरील सफाई कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, PF, HRA, ESIC Bonus व इतर लाभ संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे, सविस्तर वाचा..

$ads={1}

कंत्राटी तत्वावरील सफाई कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार

Contractual Cleaning Workers News

वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना राज्य शासनाने किमान वेतन कायद्यानुसार वेतनवाढ तसेच सुरक्षेसाठी सफाईची साधने, आरोग्याच्या सोयी- सुविधा इतर लाभ देण्याबाबत विधानपरिषद मा. सदस्य श्री. प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

वसई-विरार महानगरपालिकेने कळविल्यानुसार शहरातील 9 प्रभाग समित्यांमध्ये झोन निहाय कचरा संकलन, गटार सफाई, रस्त्यांची सफाई इ. कामांसाठीचा त्रैवार्षिक साफ-सफाईचा ठेका अभिकर्त्यांना देण्यात आला असून, त्यांच्यामार्फत दैनंदिन साफ सफाईचे मासिक वेतन मंजूर दराप्रमाणे अदा करण्यात येते.

 

त्यामध्ये किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्या बँक खात्यामध्ये कामगारांना प्रतिमाह रुपये 27379 इतके वेतन अदा करण्यात येते. त्याचबरोबर दर 6 महिन्यांनी महागाई निर्देशांकाप्रमाणे वेतनात वाढ दिली जाते. या व्यतिरिक्त PF, ESIC Bonus, HRA व गणवेश, रेनकोट, गमबुट इ. साहित्यांचे वाटप ठेकेदारामार्फत सफाई कामगारांना करण्यात येते. तसेच दर सहा महिन्यांनी सदर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. अशी माहिती राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याच्या हालचालींना वेग पहा

कामगारांच्या विविध प्रश्नावर महत्वपूर्ण बैठक संपन्न

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेशन व सदस्य पी.पी.वावा यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. राज्यातील सफाई कामगारांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सविस्तर येथे पहा...

Previous Post Next Post